AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी रोहित आर्या, आत्महत्या करण्यापेक्षा मी…; 17 मुलांचं अपहरण करणाऱ्या रोहितचा Video पाहून अख्खी मुंबई हादरली

मुंबईतील पवई स्टुडिओमध्ये रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने 19 जणांना ओलीस ठेवल्याने एकच खळबळ उडाली होती. ऑडिशनच्या बहाण्याने मुलांना बोलावून त्यांना ओलीस ठेवण्या आले होते. त्याने यावेळी एक व्हिडीओ देखील व्हायरल केला होता. त्यात त्याने आत्महत्या करण्याऐवजी मुलांना ओलीस का ठेवलं याबद्दलचा खुलासा केला होता. दरम्यान मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलांची सुटका केली. बचावकार्यादरम्यान आरोपी रोहित आर्या पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला.

मी रोहित आर्या, आत्महत्या करण्यापेक्षा मी...; 17 मुलांचं अपहरण करणाऱ्या रोहितचा Video पाहून अख्खी मुंबई हादरली
Rohit Arya videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2025 | 7:10 PM
Share

गुरुवारी दुपारी मुंबईत एक हादरवणारी घटना घडली. तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या एका बातमीने आणि हे कृत्य करणाऱ्या एका गुन्हेगाराच्या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी जीवाची बाजी लावत ओलीस ठेवलेल्यांचा जीव वाचवणे हे सर्व एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हतं. पण हे घडलं खरं. ज्यांची मुले या गुन्हेगाराने ओलीस ठेवली होती त्या पालकांचा काळजाचा ठोका चुकला होता. हा सर्व भयानक प्रकार घडला पवईती आरए स्टुडिओमध्ये.

आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांसह अशा 19 जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं.

आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांसह अशा 19 जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. दरम्यान या सर्वांना डांबून ठेवणाऱ्या आरोपीचं नाव रोहित आर्या.  त्याने या मुलांना ऑडिशनच्या नावाखाली या स्टुडिओमध्ये डांबून ठेवलं होतं. एवढंच नाही तर त्याने एक व्हिडीओ शूट केला होता. ज्यामध्ये त्याने या मुलांना ओलीस का ठेवलं आहे याचं कारण सांगितलं आहे. तसेच तो सांगताना दिसत आहे की त्याला काहीजणांशी बोलायचं आहे तसेच काही प्रश्नांची उत्तरे हवी असल्याचं म्हटलं होतं.

19 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा तो भयानक व्हिडीओ 

या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणताना दिसत आहे की, “मी रोहित आर्य आहे. आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना आखली आणि काही मुलांना ओलीस ठेवले. माझ्या फारशा मागण्या नाहीत, फक्त साध्या मागण्या आहेत. मला काही लोकांशी बोलायचे आहे आणि काही प्रश्न विचारायचे आहेत, पण मला ही उत्तरे हवी आहेत. मला दुसरे काहीही नको आहे. मी दहशतवादी नाही, किंवा मी पैसे मागत नाही. मला फक्त एक साधी चर्चा हवी आहे, म्हणूनच मी मुलांना ओलीस ठेवले आहे.”

व्हिडीओतून दिली थेट धमकी

तसेच या व्हिडीओमध्ये त्याने पुढे म्हटलं, “तुमच्या एका चुकीच्या हालचालीमुळे मी संपूर्ण जागेला आग लावू शकतो आणि त्यातच मीपण मरेन. मी मेलो की नाही याने काही फरक पडत नाही पण , मुलांना दुखापत होईल. जर त्यांचे काही वाईट घडले तर मला माहित नाही. यासाठी मला जबाबदार धरले जाऊ नये, तर जे सामान्य माणूस फक्त बोलू इच्छित असताना हे सर्व अनावश्यकपणे भडकवत आहेत त्यांना जबाबदार धरले पाहिजे. माझे बोलणे संपल्यानंतर मी स्वतःहून बाहेर येईन. माझ्यासोबत इतर अनेकजण आहेत. मी बोलेन आणि उपाय सांगेन. कृपया मला अशा प्रकारे भडकवू नका की मी कोणालाही दुखावले.” असं म्हणत त्याने थेट धमकीच दिली होती.

बचाव कार्यादरम्यान पोलिसांना रोहित आर्याचा एन्काऊंटर करावा लागला

स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावरील ऑडिशन घेण्याच्या एका रुममध्ये त्याने या 17 मुलांना आणि इतर दोघांना ओलीस ठेवले होते. घटनेची माहिती मिळताच सर्वत्र घबराट पसरली होती. पालकही चिंताग्रस्त होते. पालकांसह पोलिसांनीही स्टुडिओकडे धाव घेतली. पोलिस पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि स्टुडिओला घेराव घातला. परिस्थिती लक्षात घेता अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात हाय अलर्ट जारी केला.

दरम्यान मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलांची सुटका केली. दरम्यान बचाव कार्यादरम्यान पोलिसांना रोहित आर्याचा एन्काऊंटर करावा लागला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.पोलिसांच्या सतर्कपणामुळे आणि घेतलेल्या अॅक्शनमुळे ओलीस ठेवणाऱ्यांचे प्राण वाचले.

चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.