Video : फूड डिलिव्हरी बॉयला महिलेने चपलेनं बडवलं, जाणून घ्या काय आहे कारण

| Updated on: Apr 17, 2022 | 1:53 PM

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओमध्ये एक महिला एका फूड डिलिव्हरी बॉयला (Food Delivery Boy) मारहाण करीत असल्याचा आहे. ही मारहाण भररस्त्यात सुरू असल्याने आजूबाजूचे सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. महिलेने चक्क डिलीव्हरी बॉयला चपलेने बडवले आहे.

Video : फूड डिलिव्हरी बॉयला महिलेने चपलेनं बडवलं, जाणून घ्या काय आहे कारण
फूड डिलिव्हरी बॉयला महिलेने चपलेनं बडवलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मध्यप्रदेश – सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओमध्ये एक महिला एका फूड डिलिव्हरी बॉयला (Food Delivery Boy) मारहाण करीत असल्याचा आहे. ही मारहाण भररस्त्यात सुरू असल्याने आजूबाजूचे सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. महिलेने चक्क डिलीव्हरी बॉयला चपलेने बडवले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूरचा आहे. संबंधित व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला असून तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची पोलिसांची भूमिका आहे.

भररस्त्यात तरूणाला बडवलं

काल मध्यप्रदेशातील रसल चौकात हा व्हिडीओ भांडण पाहत असलेल्या एकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. मारहाण केलेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. महिला तिच्या गाडीवरून जात असताना चुकीच्या पध्दतीने आलेल्या डिलिव्हरी बॉयने महिलेच्या स्कूटीला धडक दिली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. धडकेत ही महिला खाली पडली. चिडलेल्या महिलेने तरूणाला चपलेनं बडवलं. महिलेला दुखापत झाल्याने तिने मारहाण केली. तसेच त्यावेळी काही लोकांनी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने महिलेने कुणाचही ऐकलं नाही. ती मारहाण करीत राहिली.

अद्याप पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची दखल घेतली आहे. परंतु तक्रार दाखल झाल्याशिवाय कारवाई करणार नाही अशी पोलिसांनी भूमिका घेतली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी व्हिडीओला कमेंट करून नेमकं काय झालं असा सवाल विचारला.

Onion Rate: शेतकऱ्यांचा वांदा अन् रुपया किलो कांदा, 5 वर्षातील निच्चांकी दर कोणत्या बाजार समितीमध्ये ?

Raj Thackeray : भोंगे ते अयोध्यावारी, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे

Raj Thackeray : 1 मे रोजी राज ठाकरे यांची तोफ औरंगाबादेत धडाडणार, पुण्यात केली घोषणा