Onion Rate: शेतकऱ्यांचा वांदा अन् रुपया किलो कांदा, 5 वर्षातील निच्चांकी दर कोणत्या बाजार समितीमध्ये ?

राजेंद्र खराडे

|

Updated on: Apr 17, 2022 | 1:16 PM

शेतीमालाच्या दरात वाढ झाली की गाजावाजा तर होणारच. अशीच चर्चा सध्या लिंबाच्या दराबाबत सुरु आहे. राज्यातील मुख्य बाजारपेठात तब्बल 200 ते 250 रुपये किलो असा दर लिंबाला मिळत आहे . दुसरीकडे दीड महिन्यापूर्वी शेतीमालाच्या बाजारपेठेत अधिराज्य असलेल्या कांद्याचा काय वांदा होऊन बसलाय याकडे मात्र, दुर्लक्ष होत आहे. अहो तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी कांद्याची अवस्था झाली आहे. दराच्या लहरीपणामुळे कांद्याची वेगळीच ओळख आहे. पण अधिकतर वेळेस या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांनाच बसलेला आहे.

Onion Rate: शेतकऱ्यांचा वांदा अन् रुपया किलो कांदा, 5 वर्षातील निच्चांकी दर कोणत्या बाजार समितीमध्ये ?
Image Credit source: TV9 Marathi

औरंगाबाद : शेतीमालाच्या दरात वाढ झाली की गाजावाजा तर होणारच. अशीच चर्चा सध्या (Lemon) लिंबाच्या दराबाबत सुरु आहे. राज्यातील मुख्य बाजारपेठात तब्बल 200 ते 250 रुपये किलो असा दर लिंबाला मिळत आहे . दुसरीकडे दीड महिन्यापूर्वी शेतीमालाच्या बाजारपेठेत अधिराज्य असलेल्या (Onion Crop) कांद्याचा काय वांदा होऊन बसलाय याकडे मात्र, दुर्लक्ष होत आहे. अहो तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी कांद्याची (Onion Rate) अवस्था झाली आहे. दराच्या लहरीपणामुळे कांद्याची वेगळीच ओळख आहे. पण अधिकतर वेळेस या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांनाच बसलेला आहे. जिल्ह्यातील पैठणच्या बाजारसमितीमध्ये कांद्याला चक्क रुपया किलो असा दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था काय असावी याची कल्पनाच न केलेली बरी..

सर्वात निच्चांकी दर पैठण बाजार समितीमध्ये

उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाल्यापासून दरात घट होत होती. पण वाहतूक आणि चार पैसे पदरात पडतील अशी स्थिती कांद्याच्या दराची होती. पण गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या आवकमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वी याच बाजार समितीमध्ये 200 ते 900 असा दर होता. मात्र, आवकमध्ये सातत्या राहिल्याने 240 रुपये क्विंटलहून कांदा थेट 100 रुपये क्विंटलवरच येऊन ठेपला आहे. कांद्याच्या दर्जानुसार दर असले तरी सर्वाधिक दर 800 तर सर्वात कमी 100 रुपये क्विंटल ही कांद्याची अवस्था झाली आहे.

लागवड खर्च सोडा वाहतूक देण्याचे वांदे

कांदा हे नगदी पीक असल्याने प्रत्येक हंगामात या पिकाचा प्रयोग हा केला जातो. खरिपातील लाल कांद्याला विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या पण वाढत्या आवकमुळे आणि घटलेल्या मागणीमुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. चार महिने मेहनत, पाणी,औषध फवारणी हे सर्व करुन जर शेतीमालाच्या वाहतूकीचा खर्च त्या मालातून निघत नसेल तर कशी शेती करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

पैठण बाजार समितीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाची आवक ही सुरु असते. मात्र, कांद्याची आवक इतर मालापेक्षा जास्त असते. गेल्या तीन दिवसांपासून 200 ते 900 असा दर मिळत होता. मात्र, आवक वाढल्याने शुक्रवारी फुटीच्या कांद्याला थेट 100 रुपये क्विंटल असाच दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री करणे गरजेचे आहे. अन्यथा, कांदाचाळीचा वापर करुन कांदा साठवणूक करणे गरजेचे आहे. सध्या मागणीच नसल्याने ही अवस्था झाल्याचे व्यापारी राहुल मुंढे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Sangli : पीकविमा रखडला, राज्य कृषिमंत्र्यांनी सांगितली ‘अंदर की बात’, केंद्र अन् राज्यातील मतभेदाचा फटका बळीराजाला

Sugarcane Sludge : पावसामुळे वाढला उसाचा गोडवा, साखर उत्पादनात महाराष्ट्रच नंबर वन..!

Maharashtra Water Crisis : : वरुणराजाच्या कृपादृष्टीनंतरही पाणीसाठा 62 टक्क्यांवर, राज्यात 34 टॅंकरने पाणीपुरवठा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI