इतक्या गोळ्या घालीन की.., त्याच्या छातीवर पिस्तुल ठेवून… रिव्हॉल्व्हर राणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल!

उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे, जिथं कधी काय होईल हे सांगता येत नाही. इथं याआधी असे काही गुन्हे घडले आहेत ज्यामुळे संपूर्ण देश हादरून गेलेला आहे. बंदुका, गोळीबार, चाकुहल्ल्याच्या घटना तर इथे दरवर्षी अनेक घडतात.

इतक्या गोळ्या घालीन की.., त्याच्या छातीवर पिस्तुल ठेवून... रिव्हॉल्व्हर राणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल!
up hardoi girl pistol
| Updated on: Jun 16, 2025 | 3:20 PM

Uttar Pradesh Hardoi Revolver Video : उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे, जिथं कधी काय होईल हे सांगता येत नाही. इथं याआधी असे काही गुन्हे घडले आहेत ज्यामुळे संपूर्ण देश हादरून गेलेला आहे. बंदुका, गोळीबार, चाकुहल्ल्याच्या घटना तर इथे दरवर्षी अनेक घडतात. दरम्यान, सध्या उत्तर प्रदेश हे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. इथे एका तरुणीने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या छातीवर बंदुक ठेवून थेट धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

सध्या उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणीने आपल्या गाडीतून पिस्तुल घेऊन थेट पेट्रोल पंपाला धमकावताना दिसत आहे. पेट्रोल टाकण्यासाठी आलेला कारमालक आणि पेट्रओल पंपावारील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादानंतर कारमालकाच्या लेकीने हा प्रताप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

नेमका प्रकार काय, काय घडलं?

एहसान खान नावाची व्यक्त हरदोई येथील बिलग्राम या भागातील पेट्रोल पंपावर सीएनजी टाकायला गेले होते. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने एहसान यांना सुरक्षेच्या कारणामुळे कारमधून उतरण्यास सांगितले होते. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि एहसान यांच्यात वाद चालू झाला. हा वाद वाढत असताना एहसान खान यांची पत्नी तसेच त्यांची मुलगी या वादात सहभागी झाल्या.

पिस्तुल थेट छातीवर ठेवलं अन्…

हा वाद चालू असताना एहसान यांची अरिबा नावाची मुलगी पळत-पळत कारजवळ गेली आणि तिने कारमधून गोळ्यांनी भरलेले पिस्तुल बाहेक काढले. अरिबाच्या हातात परवाना असलेले पिस्तुल होते. हे पिस्तुल तिने थेट पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या छातीवर ठेवून त्याला धमकावलं. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मध्ये येत वाद मिठवला. अरिबा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला धमकावत असतानाच प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

गुन्हा दाखल तिन्ही आरोपी ताब्यात

धमकावण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव रजनीश कुमार असे आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाची सध्या चौकशी चालू आहे.