सोलापुरात पोलिसांसोबतच्या चकमकीत दरोडेखोर ठार

सोलापूर : पोलीस आणि दरोडेखोर यांच्यातील चकमकीत दरोडेखोराचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली. या चकमकीत पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. एका पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी दरोडेखोरांनी केलेल्या तलवार हल्ल्यात जखमी झाले आहेत. सोलापूर-तुळजापूर रोडवरील उळेगाव नजदीकची रविवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यानची ही घटना आहे. सोलापूर ग्रामीणचे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय पाटील …

सोलापुरात पोलिसांसोबतच्या चकमकीत दरोडेखोर ठार

सोलापूर : पोलीस आणि दरोडेखोर यांच्यातील चकमकीत दरोडेखोराचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली. या चकमकीत पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. एका पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी दरोडेखोरांनी केलेल्या तलवार हल्ल्यात जखमी झाले आहेत. सोलापूर-तुळजापूर रोडवरील उळेगाव नजदीकची रविवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यानची ही घटना आहे.

सोलापूर ग्रामीणचे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय पाटील हे रात्रगस्त करत होते. यावेळी त्यांनी एका संशियत कारचा पाठलाग केला त्यांना हटकलं. पण त्यातील एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी पोलिसांवर तलवारीने आणि दगडफेक सुरु केली.

प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार करून एका दरोडेखोराला जखमी केलं. जखमी केलेल्या दरोडेखोरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर उर्वरित पाच दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या चकमकीत पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांचे दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने उळेगाव शिवारात भीतीचं वातावरण पसरलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *