KKR vs PBKS : पंजाबने कोलकाता विरुद्ध टॉस जिंकला, बॅटिंग कुणाची?

Kolkata Knight Riders vs Punjab Kings Toss : पंजाब किंग्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध टॉस जिंकला आहे.

KKR vs PBKS : पंजाबने कोलकाता विरुद्ध टॉस जिंकला, बॅटिंग कुणाची?
kkr vs pbks toss ipl 2024,
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 7:58 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डनमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. पंजाब किंग्सच्या बाजीने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन सॅम करन याने फिल्डिंगचा निर्णय घेत कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

दोन्ही संघात बदल

पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे पंजाबच्या नेतृत्वाची धुरा सॅम करनकडे आहे. सॅमने आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. लियाम लिविंगस्टोनच्या जागी जॉनी बेयरस्टोचा समावेश करण्यात आला आहे. तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू केकेआरचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा दुखापतीमुळे या सामन्यात नाही. त्यामुळे स्टार्कच्या जागी दुष्मंथा चमीरा याला केकेआरकडून पदार्पणाची संधी मिळाली. स्टार्कने चमिराला कॅप दिली आणि त्याचं स्वागत केलं. चमीरा याआधी लखनऊकडून आयपीएलमध्ये खेळला आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात एकूण 32 सामने झाले आहेत. कोलकाताने पंजाब विरुद्ध 32 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. कोलकातने 21 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबला 11 सामने जिंकण्यात यश आलं आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार, कोलकाता पंजाबवर वरचढ आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स 5 विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर शिखर धवन याच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्स भरकटली आहे. पंजाबला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. पंजाबला आतापर्यंत 8 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत.

कोलकाता विरुद्ध पंजाब आमनेसामने

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रायली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.