Rekha : जया बच्चनच नाही अनेक श्रीमंत पुरुषांच्या बायकांनी रेखा यांना धरलेलं धरेवर… एक तर म्हणालेली, इतरांच्या नवऱ्यांना देते सिग्नल
Rekha : ती तर डायन... इतरांच्या नवऱ्यांना देते सिग्नल... फक्त जया बच्चनच नाही तर, बॉलिवूडमधील अनेक श्रीमंत पुरुषांच्या बायकांनी रेखा यांना धरलेले धरेवर... प्रचंड खडतर होतं रेखा यांचं खासगी आयुष्य

Rekha : बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी लग्न आणि दुसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं… ‘मी तर जीवनाशी लग्न केलं होतं…’ असं रेखा म्हणालेल्या. रेखा यांच्या खासगी आणि वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, महानायक अमिताभ बच्चन यांनी जगासमोर स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण घटस्फोटाच्या आधीच मुकेश यांनी स्वतःला संपवलं…
रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, फक्त जया बच्चन यांनीच नाही तर, बॉलिवूडमधील अनेक श्रीमंत पुरुषांच्या बायकांनी रेखा यांना धरेवर धरलेले. अनेकांनी रेखा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं. कुणी त्यांना डायन म्हणालं तर, कोणी इतरांच्या नवऱ्यांना देते सिग्नल… असं देखील म्हणाले…
नरगिस यांचं रेखा यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य
रेखा आणि संजूबाबा यांनी कायम दोघांमध्ये सुरु असलेल्या रोमान्सच्या चर्चांवर मौन बाळगलं होतं. पण रेखा यांच्याबद्दल नरगिस यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रेखा चेटकीण आहे आणि ती पुरुषांना सिग्नल देते… एवढंच नाही तर, रेखाला एका सक्षम पुरुषाची गरज आहे… असं देखील नरगिस म्हणाल्या होत्या.
मौसमी चॅटर्जी यांच्यासोबत वाद…
‘भला’ सिनेमा दरम्यान रेखा आणि मौसमी यांच्यामध्ये वाद झालेले… असं देखील सांगण्यात येतं… एका मुलाखतीत मौसमी म्हणालेल्या, ‘विनोद खन्ना यांच्यामुळे आमच्यात वाद झालेले…’ एक काळ असा होता, जेव्हा रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरलेला. मौसमी म्हणालेल्या, ‘रेखा यांच्या मनात संशय होता… कारण त्यांना असं वाटायचं की मौसमी विनोद यांना कंट्रोल करत आहे…’
विनोद मेहरा यांच्यासोबत वाद
मौसमी म्हणालेल्या, ‘मी विनोद यांच्या घरी होती आणि रेखा देखील तिथेच होत्या… विनोद यांच्या आई इंदू यांनी मला त्यांच्यासाठी एका काम सांगितलं, जे रेखा यांना आवडलं नाही…’ या कारणामुळे देखील रेखा आणि मौसमी यांच्यात वाद होते… रेखा आज बॉलिवूडपासून दूर आहेत. पण कोणत्या न कोणत्या कारणामुळे आजही चर्चेत असतात.
