गुप्तधन आणि पुत्रप्राप्तीचे आमिष, भोंदूबाबाकडून एका मुलीवर बलात्कार, कुटुंबातील तिघींचा विनयभंग

गुप्तधन आणि पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवत भोंदूबाबाने कुटुंबातील एका तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली (Girl rape in Pimpri Chinchwad) आहे.

Girl rape in Pimpri Chinchwad, गुप्तधन आणि पुत्रप्राप्तीचे आमिष, भोंदूबाबाकडून एका मुलीवर बलात्कार, कुटुंबातील तिघींचा विनयभंग

पिंपरी चिंचवड : गुप्तधन आणि पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवत भोंदूबाबाने एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली (Girl rape in Pimpri Chinchwad) आहे. तसेच पीडित कुटुंबातील इतर तीन मुलींचाही विनयभंगही केल्याचा आरोप भोंदूबाबावर आले. सोमनाथ कैलास चव्हाण असे या आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे. पिंपरी चिंचवडमधील नेहरुनगर परिसरात ही घटना घडली.

“घरात पुत्रप्राप्ती होऊ नये यासाठी घरातील सदस्यांवर नात्यातील एका बाईने करणी केली आहे. तसेच तुमच्या घरात एका खोलीमध्ये गुप्तधन आहे. त्यात अनेक मौल्यवान वस्तू आहेत. त्याशिवाय तुमच्या घरातील एका मुलीचा जीवही धोक्यात आहे,” असे या सोमनाथ चव्हाण भोंदूबाबाने या कुटुंबाला सांगितले होते.

पुत्रप्राप्ती होण्यासाठी आणि गुप्तधन मिळवण्यासाठी तुम्हाला घरात तीन उतारे आणि नग्न पूजा करावी लागेल. मी पूजा आणि उतारे केले नाहीत तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जीवितास मोठा धोका आहे, असे सांगून या भोंदूबाबाने लाखो रुपये (Girl rape in Pimpri Chinchwad) उकळले.

या दरम्यान त्याने या कुटुंबातील इतर तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तर त्याच कुटुंबातील एका तरुणीवर बलात्कार केला.

“जर बलात्कार केल्याचे कोणाला सांगितलंस तर मी तुझ्या आई-वडिलांना माझ्या दैवी शक्तीने आणि काळ्या जादूने मारुन टाकेन,” अशी धमकीही आरोपीने पीडित तरुणीला दिली.

दरम्यान याप्रकरणी सोमनाथ कैलास चव्हाण याला पिंपरी पोलिसांनी त्याच्या मूळ गाव खैरेवाडी रायगड जिल्ह्यातून काल (24 फेब्रुवारी) रात्री उशिरा अटक केली. त्याच्यावर बलात्कार करणे नरबळी इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक करण्याबाबतच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला (Girl rape in Pimpri Chinchwad) आहे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *