माहीम बीचवर सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुकडे

माहीम बीचवर समुद्रातून एका वाहून आलेल्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुकडे (Man body part found in bag) मिळाले आहेत.

माहीम बीचवर सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुकडे

मुंबई : माहीम बीचवर समुद्रातून एका वाहून आलेल्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुकडे (Man body part found in bag) मिळाले आहेत. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. काल (2 डिसेंबर) संध्याकाळी ही सुटकेस माहीम बीचवर सापडली. अद्याप मृताची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबईच्या माहीम बीचवर ही सुटकेस वाहून (Man body part found in bag) आल्याने तेथील स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुटकेस उघडून पाहिली असता यामध्ये हात, पाय कापलेले मिळाले.

ही सुटकेस मिळाल्यानंतर पोलिसांनी मच्छीमाऱ्यांच्या मदतीने समुद्रात शोधकार्य सुरु केले. पण या सुटकेसच्या व्यतिरिक्त पोलिसांना काही सापडले नाही.

ही सुटकेस पोस्टमॉर्टमकरीता सायन रुग्णालयात पाठवण्यात आली आहे. या सुटकेसमध्ये मिळालेले हात-पाय पुरुषाच्या शरीराचे आहेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या पोलिसांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्येही या घटनेची माहिती दिली आहे. तसेच हरवलेल्या व्यक्तींची माहिती मागवण्यात आली आहे.

“समुद्रातून मिळालेल्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुकडे आहेत. त्यानंतर समुद्रातील मच्छीमाऱ्यांच्या मदतीने आम्ही शोधकार्य केले. पण काही सापडले नाही. सध्या हे तुकडे सायन रुग्णालयात पाठवले असून अधिक तपास सुरु आहे”, असं पोलिसांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *