मुलीची हत्या करुन मराठी अभिनेत्रीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गूढ उकललं

मराठी टीव्ही अभिनेत्री प्रज्ञा पारकर यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीची हत्या करत आत्महत्या केली, अशी बाब त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आली आहे.

मुलीची हत्या करुन मराठी अभिनेत्रीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गूढ उकललं

ठाणे : पोटच्या मुलीची हत्या करुन मराठी अभिनेत्री प्रज्ञा पारकर (Actress Pradnya Parkar Suicide) यांनी केलेल्या आत्महत्येचं गूढ अखेर उकललं आहे. पतीच्या जाचाला कंटाळून प्रज्ञा यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलं आहे. पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पती प्रशांत पारकरला अटक करण्यात आली आहे.

ठाण्यात गेल्या शुक्रवारी पारकर मायलेकीच्या मृत्यूची बातमी आल्यामुळे सर्वांचं हृदय हेलावलं होतं. ठाण्यातील कळव्यामध्ये गौरी सुमन सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर मायलेकी राहत होत्या. शुक्रवारी सकाळच्या सुमारास प्रज्ञा यांनी राहत्या घरात 17 वर्षांची मुलगी श्रुतीची तोंड-नाक आणि गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतःही किचनमधील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन जीव दिला. या घटनेचा तसाप कळवा पोलिस तपास करत आहेत.

प्रज्ञा पारकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. कळवा पोलीस ठाण्यात प्रज्ञा यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे, तर पती प्रशांत पारकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.

चिठ्ठीच्या पहिल्या पानावर काय?

आत्महत्या करत आहे श्रृतीसकट… फसलेले लग्न, तुटलेल्या संसाराचे ओझे आता नाही जमत कॅरी करायला.
प्रशांत सोडून माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही.

प्रज्ञा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार प्रशांत याने वेळोवेळी दिलेल्या मानसिक त्रासामुळे प्रज्ञा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं समोर आलं आहे. आर्थिक चणचणीतून प्रज्ञा यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज सुरुवातीला बांधला जात होता.

पोलिसांनीच प्रशांत पारकरविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. त्याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास कळवा पोलिस करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *