पाच बायकांची हौस भागवण्यासाठी लाखोंचा गंडा, नवऱ्याला अटक

मध्य प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) ला बुधवारी (16 ऑक्टोबर) एक मोठ यश प्राप्त झालं. ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंस (AIIMS) मध्ये परिचारीका म्हणून नोकरीला लावून देणार असल्याचं सांगत अनेकांची फसणूक करणाऱ्या एका गटाला एसटीएफने ताब्यात घेतलं आहे

Bhopal Man cheated 50 girls, पाच बायकांची हौस भागवण्यासाठी लाखोंचा गंडा, नवऱ्याला अटक

भोपाळ : मध्य प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) ला बुधवारी (16 ऑक्टोबर) एक मोठ यश प्राप्त झालं. ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंस (AIIMS) मध्ये परिचारीका म्हणून नोकरीला लावून देणार असल्याचं सांगत अनेकांची फसणूक करणाऱ्या एका गटाला एसटीएफने ताब्यात घेतलं आहे (Bhopal Man cheated 50 girls). धक्कादायक म्हणजे या गँगच्या मास्टरमाईंडच्या पाच पत्नींची हौस पूर्ण करण्यासाठी ही फसवणूक केली जात होती (wife expectations).

गँगचा मास्टरमाईंड गजाआड

महिलांना एम्स रुग्णालयात परिचारीकेची नोकरी मिळवून देऊ, असं सांगत आतापर्यंत अनेक महिलांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार पोलिसांना मिळाली (Bhopal Man cheated 50 girls). त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण एसटीएफला सोपवलं. तपासाअंती एसटीएफने या गँगचे मास्टरमाईंड असलेले दिलशाद खान आणि आलोक कुमार बामने यांनी अटक केली.

दिलशाद खानच्या पाच पत्नी

एसटीएफनुसार, या गँगने एम्समध्ये परिचारीका म्हणून नोकरी लावून देण्याच्या नावावर आतापर्यंत 50 पेक्षा जास्त महिलांकडून लाखो रुपये उकळले आहेत.

अटक केलेल्या दिलशाद खानची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. दिलशाद खान याच्या पाच पत्नी आहेत. त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी, त्यांचा सांभाळ करण्यासाठी दिलशाद खानने लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली, अशी माहिती एसटीएफने दिली.

दिलशादची एक पत्नी जबलपूरमध्ये एक क्लिनीक चालवते. तर दिलशादचा साथीदार आलोकची पत्नी भोपाळमध्ये सरकारी मुलींच्या वसतीगृहाची सुपरिटेंडेंट आहे. सध्या या दोन्ही महिलांचा या फसवणूक प्रकरणाशी सरळ संबंध असल्याचं सिद्ध झालेलं नाही, तरीही त्यांना क्लीन चिटही देण्यात आलेली नाही, अशी माहिती एसटीएफने दिली. तसेच, गरज पडल्यास त्यांचीही चौकशी केली जाऊ शकते.

नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित महिला या गँगच्या निशाण्यावर असायच्या. त्यानंतर हे लोक त्यांना एम्समध्ये परिचारीका पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळायचे. अशाप्रकारे या लोकांनी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांची फसवणूक केल्याची माहिती आहे. या आरोपींनी आतापर्यंत या महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *