विवाहबाह्य संबंधातून महिलेचं नाक आणि गळा कापला

ठाणे : विवाहबाह्य संबंधातून 27 वर्षीय विवाहित महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना विरारमध्ये घडली. प्रियकराने महिलेचा राहत्या घरातच धारदार हत्याराने गळा आणि नाक कापले. विरार पूर्व साईनाथ नगर येथे 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता हे हत्याकांड उघड झाले. अमोल गणपत औदारे (28) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सोसायटीतील CCTV च्या आधारे हत्याकांडाचा उलघडा करुन 24 …

विवाहबाह्य संबंधातून महिलेचं नाक आणि गळा कापला

ठाणे : विवाहबाह्य संबंधातून 27 वर्षीय विवाहित महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना विरारमध्ये घडली. प्रियकराने महिलेचा राहत्या घरातच धारदार हत्याराने गळा आणि नाक कापले. विरार पूर्व साईनाथ नगर येथे 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता हे हत्याकांड उघड झाले. अमोल गणपत औदारे (28) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सोसायटीतील CCTV च्या आधारे हत्याकांडाचा उलघडा करुन 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. हत्या केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या झालेली महिला पतीसोबत विरार पूर्वमधील साईनाथ नगर येथे भाड्याने राहात होती. ते येथे मागील 1 वर्षांपासून राहत होते. त्यांचा 7 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण त्यांना मूलबाळ झाले नव्हते. पत्नी बोरिवलीतील ज्वेलरी कंपनीमध्ये काम करत होती, तर पतीही एका खासगी कंपनीत काम करत होता. 27 एप्रिल रोजी पती कामानिमित्त मूळ गावी गेला होता आणि पत्नी एकटीच घरी होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी 8 च्या सुमारास या महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. स्थानिक रहिवासी महिलांनी दारही वाजवले, पण कोणीही दार उघडले नाही. तेव्हा नवरा बायकोचे भांडण असेल, असे समजून शेजारी महिलांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. रात्री महिलेचा पती घरी आल्यावर दार उघडून पाहिले, तर त्याला पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

CCTV च्या मदतीने गुन्हेगार जेरबंद

याबाबत पतीच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन विरार पोलिसांनी तपास सुरु केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी डॉ. सागर वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम तपासासाठी रवाना केली. पोलिसांनी सोसायटीचे CCTV तपासले असता 27 एप्रिल रोजी एक तरुण टोपी घालून संबंधित महिलेच्या रुममध्ये आल्याचे दिसले. या तरुणाला महिलेच्या पतीने ओळखले आणि तो पत्नीसोबत काम करत होता असे सांगितले. तसेच पत्नी त्याला मामे भाऊ म्हणत होती, अशीही माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना त्या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला.

‘प्रियकरासोबतचे संबंध तोडण्यावरुन वाद’

महिलेचे ती ज्या कंपनीत काम करत होती  त्याच ठिकाणी राहणाऱ्या 28 वर्षीय अमोल गणपत औदोरे यांच्यासोबत 1 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 27 एप्रिल रोजी पती गावाला गेल्याची संधी साधून तिने प्रियकराला रात्री घरी बोलावले होते. रात्रभर दोघेही एकत्र होते. सकाळी या दोघांचे भांडण झाले. महिलेला प्रियकरासोबतचे संबंध तोडायचे होते. त्यानंतर तिने आरोपी अमोलला सांगितलेही. मात्र, आरोपी अमोलने संबंध तोडायला नकार दिला. शेवटी महिलेने तिचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यावर आरोपी प्रियकराने रागाच्या भरात धारदार हत्याराने तिच्यावर वार केले आणि तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

संबंधित व्हिडीओ: 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *