बहिणीला छेडल्याचा बनाव रचत 17 लाख लुटले

मुंबई: बहिणीला छेडल्याचा बनाव रचत 17 लाख रुपये लुटल्याची घटना कल्याणमध्ये उघड झाली आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखेनं 3 लुटारुंना बेड्या ठोकल्या आहेत. शशिकांत चव्हाण हे कंपनीची रोकड बँकेत जमा करण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना 2 तरुणांनी वाटेतच अडवून बहिणीला छेडल्याचा जाब विचारत, बेदम मारहाण केली. मग त्याला त्याच्याच दुचाकीवर बसवून पोलीस स्टेशनला नेण्याचा बहाना …

बहिणीला छेडल्याचा बनाव रचत 17 लाख लुटले

मुंबई: बहिणीला छेडल्याचा बनाव रचत 17 लाख रुपये लुटल्याची घटना कल्याणमध्ये उघड झाली आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखेनं 3 लुटारुंना बेड्या ठोकल्या आहेत.

शशिकांत चव्हाण हे कंपनीची रोकड बँकेत जमा करण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना 2 तरुणांनी वाटेतच अडवून बहिणीला छेडल्याचा जाब विचारत, बेदम मारहाण केली. मग त्याला त्याच्याच दुचाकीवर बसवून पोलीस स्टेशनला नेण्याचा बहाना करुन निर्जनस्थळी नेले. तिथे त्याच्याकडील 17 लाख रुपये घेऊन हे चोरटे पसार झाले.

या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कल्याण गुन्हे शाखेने सीसीटीव्हीच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावला.

याप्रकरणी पोलिसांनी लखन रोकडे, प्रतीक अहिरे, योगेश राजवळ या तिघांना गजाआड केले आहे. या संपूर्ण घटनेचा सूत्रधार योगेश राजवळ आहे. योगेश हा आधी त्याच कंपनीमध्ये कामाला होता. त्यांच्या जवळून पोलिसांनी 14 लाख 80 हजार रोकड आणि 3 मोटर सायकल जप्त केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *