सासू-सूनेचा वाद, पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या

आई बायकोला घरी येऊ देत नाही म्हणून मुलाने आपल्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.

सासू-सूनेचा वाद, पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या

कल्याण : आई बायकोला (Wife) घरी येऊ देत नाही म्हणून मुलाने आपल्या आईची निर्घृण हत्या (Son Killed Mother) केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये (Kalyan) घडली आहे. अमन मुल्ला (Aman mulla) असे या आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी (Kalyan crime) या आरोपीला (Murder case) अटक केली आहे.

कल्याण पश्चिमेतील भोईवाडा (Kalyan Crime) परिसरात या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरुन गेला. परिसरातील गफूर पॅलेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका घरात एका महिलेचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. परिसरातील अनेक लोक बिल्डिंगच्या खाली जमा झाले, मात्र कोणीही वर जायला तयार नव्हतं. थोड्याच वेळात एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन शेजारच्या घरात आली. त्यावेळी अमन मुल्ला या तरुणाने आपली आई रुक्साना हिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले.

दरम्यान, बाजारपेठ पोलीस घटनास्थळी पोहचले तोपर्यंत अमनने त्याच्या आईची निर्घृणपणे हत्या केली होती आणि तो एका कोपऱ्यात बसला होता. घरात जी काही वस्तू सापडेल, त्या वस्तूने अमनने आपल्या आईवर हल्ला करत तिचा जीव घेतला.

अमनची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेलेली होती. अमनच्या आईने तिला जबरदस्ती माहेरी पाठवले होते. बायकोला बोलवून घे, अशी अमन वारंवार आपल्या आईला विनंती करत होता. मात्र, आई काही ऐकत नव्हती. अखेर चिडून अमनने आपल्या आईचा खून केला. मात्र त्याचवेळी अमनची वहिनी आपल्या दोन मुलांसोबत घराबाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचले.

पत्नीसाठी आपल्या जन्मदात्या आईला संपवणारा अमनला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *