ZP School : शाळेत मधमाश्यांचा हल्ला ! विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला, विद्यार्थी रुग्णालयात दाखल

| Updated on: Apr 30, 2022 | 5:21 PM

शाळेतील 12 विद्यार्थ्यांपैकी आज शेवटचा दिवस असल्यामुळे 8 विद्यार्थी हजर होते.या आठही जणांना दंश करत मधमाशांनी शिक्षकांनाही आपले लक्ष केले. चावा घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लगेचच रूग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ZP School : शाळेत मधमाश्यांचा हल्ला ! विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला, विद्यार्थी रुग्णालयात दाखल
विद्यार्थी आणि शिक्षकांवर मधमाश्यांचा हल्ला
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

सिंधुदुर्ग : शाळेच्या शेवटच्या दिवशी (Last Day) कणकवली तालुक्यातील कळसुली गावडेवाडी जिल्हा परिषद शाळेवर मधमाशांनी हल्ला करून 8 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा चावा घेतला. जिल्हा परिषद शाळांना उद्यापासून हंगामी सुट्टी (Holidays) असून आज शाळेचा (Schools) शेवटचा दिवस होता. मात्र हा शेवटचा दिवस दुर्दैवी ठरला. अचानक मधमाशांच्या थव्याने शाळेवर हल्ला करत मिळेल त्याचा चावा घेतला. शाळेतील 12 विद्यार्थ्यांपैकी आज शेवटचा दिवस असल्यामुळे 8 विद्यार्थी हजर होते.या आठही जणांना दंश करत मधमाशांनी शिक्षकांनाही आपले लक्ष केले. चावा घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लगेचच रूग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेवटचा दिवस असल्याने 12 पैकी 8 विद्यार्थी हजर होते. काही विद्यार्थी व्हरांड्यात खेळत होते. अचानक विद्यार्थी धावत येऊन शिक्षकांना बिलगले. काहीच वेळात मधमाश्यांनी बऱ्याच जणांवर हल्ला केला. जवळपास 100 मधमाश्यांना शिक्षक विद्यार्थ्यांनी मिळून झाडूने मारले.मधमाश्यांनी चावा घेतल्यामुळे विद्यार्थी जखमी झाले. अँब्युलन्स बोलावली गेली आणि विद्यार्थ्यांना दवाखान्यात दाखल केलं गेलं. दरम्यान विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत अस शाळेतील एका शिक्षिकेने सांगितलंय.

हे सुद्धा वाचा

शाळांना 2 मे ते 12 जूनपर्यंत सुट्टी जाहीर

महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर राज्यातील शाळांच्या सुट्टींविषयीही प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शाळांना 2 मे ते 12 जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली. ही सुट्टी इयत्ता पहिली ते अकरावी पर्यंतच्या शाळांना देण्यात आली आहे. सुट्टी संपल्यानंतर जून मध्ये लगेचच शाळा सुरु करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.