CBSE 12th 2022 Topper: बुलंदशहर की बुलंद तस्वीर! तान्या सिंह अव्वल, 500 पैकी 500 मार्क मिळवले

तान्याला सिंगला 500 पैकी 500 गुण

CBSE 12th 2022 Topper: बुलंदशहर की बुलंद तस्वीर! तान्या सिंह अव्वल, 500 पैकी 500 मार्क मिळवले
JoSAA roud 2 result
| Edited By: | Updated on: Jul 22, 2022 | 1:44 PM

नवी दिल्ली : ज्या दिवसाची सगळे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहात होते, तो दिवस अखेर उजाडला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल (CBSE 12th results 2022) जाहिर करण्यात आला आहे. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली. बारावी सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकूण 94.54 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 91.25 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.93 टक्के इतका लागला. तर 97.04 टक्के एवढा केंद्रीय विद्यालयाचा निकाल लागला आहे. यात बुलंदशहरच्या लेकीची जोरदार चर्चा आहे. बुलंदशहरच्या तान्या सिंगने रेकॉर्ड केला आहे. कारण तिला सगळ्या विषयात पैकीच्या पैकी म्हणजे 500 पैकी 500 गुण मिळाले आहेत. ती बुलंदशहरच्या दिल्ली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे.

तान्याला 500 पैकी 500 गुण

सीबीएसईचा निकाल लागला. त्यानंतर बुलंदशहरच्या लेकीची जोरदार चर्चा आहे. बुलंदशहरच्या तान्या सिंगने रेकॉर्ड केला आहे. कारण तिला सगळ्या विषयात पैकीच्या पैकी म्हणजे 500 पैकी 500 गुण मिळाले आहेत. ती बुलंदशहरच्या दिल्ली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. या शाळेतील आणखी एक विद्यार्थिनी भूमिका गुप्ता हिला 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. तर सौम्या नामदेव हिला 500 पैकी 497 गुण मिळाले आहेत.

थोड्याच वेळात दहावीचा निकाल

थोड्याच वेळात म्हणजे दुपारी दोन वाजता सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत बोर्डाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.आज दुपारी दोन वाजता दहावीचा निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होते. सीबीएसई बोर्डाची टर्म एकची परीक्षा ही एमसीक्यू फॉरमॅटमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. तर टर्म 2 परिक्षा ही डिस्क्रिप्टि स्वरुपात घेण्यात आली होती.