CBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यास निकाल कसा लागणार? सीबीएसई-आयसीएसई बोर्डांचा नव्या फॉर्म्युल्यावर विचार

| Updated on: May 30, 2021 | 11:39 AM

बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यास निकाल कसा जाहीर करायचा यासाठी सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्ड विचार करत आहे. CBSE ICSE

CBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यास निकाल कसा लागणार? सीबीएसई-आयसीएसई बोर्डांचा नव्या फॉर्म्युल्यावर विचार
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

CBSE 12th Board Exam 2021नवी दिल्ली: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेखाली गेल्या रविवारी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि राज्यांचे शिक्षणमंत्री यांच्यात बारावीच्या बैठक झाली. या बैठकीला आठ दिवस झाल्यानंतर अजूनही बारावीच्या परीक्षांवर सर्वमान्य निर्णय जाहीर झालेल्या नाही. सीबीएएसई बोर्ड आणि अन्य परीक्षा बोर्डांकडून बारावीच्या परीक्षा आयोजित करण्या ऐवजी दुसऱ्या पर्यायावर विचार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आयसीएसई बोर्डाकडून विद्यार्थ्यांना मिळालेले अकरावीचे गुण आणि टक्केवारी याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय सीबीएसईकडून देखील गेल्या तीन वर्षांमधील निकालांची माहिती मागवण्यात येईल, अशी शक्यता आहे. (CBSE 12th Board Exam CBSE and ICSE Board discussing on new formula for result of class 12th)

सीआयसीई बोर्डानं माहिती मागवली

सीआयसीई बोर्डानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीचं घेतला आहे. सीआयसीईचे सचिव गेरी अराधून यांनी शाळांना पत्र पाठवलं आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे. बोर्डानं मागितलेली माहिती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीआयसीईने शाळांकडून विद्यार्थ्यांचे अकरावीची माहिती मागवली असल्याचं समोर आल्ं आहे. दरम्यान अजूनही बारावीच्या परीक्षांवर सर्वमान्य तोडगा निघालेला नाही.

सीबीएसई बोर्डाकडून नव्या पर्यायाचा विचार

सीबीएसई बोर्डाकडून बारावी परीक्षेसंबंधी नव्या पर्यायावर विचार करण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेसंबंधी तोडगा निघाला नाही आणि परीक्षा रद्द कराव्या लागल्यास निकाल कसा जाहीर करायचा, याविषयी चर्चा करण्यात येत आहे. सीबीएसई बोर्ड नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर करु शकते. मात्र, सीबीएसई बोर्ड परीक्षा घेण्याच्या बाजूनं असल्याची माहिती आहे.

1 जूनला निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक झाल्यांनंतर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या जात आहेत, अशी घोषणा केली होती. तर, त्यावेळी बारावी परीक्षांबद्दलचा निर्णय 1 जून रोजी कोरोना स्थितीचा आढावा घेऊन जाहीर केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. सीबीएसई आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय येत्या अंतिम निर्णय 1 जून रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

बारावीच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, ऑनलाईन परीक्षा हा देखील पर्याय, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचं मत

CBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षा होणार की नाही? राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी काय भूमिका घेतली?

(CBSE 12th Board Exam CBSE and ICSE Board discussing on new formula for result of class 12th)