CBSE 12th Board Exam 2021: बारावी परीक्षांच्या निर्णयापर्यंत पोहोचलोय, केंद्रीय शिक्षणमंत्री उच्चस्तरीय बैठकीवर काय म्हणाले?

| Updated on: May 23, 2021 | 6:56 PM

CBSE 12th Board Exam 2021 केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीबाबत माहिती दिली आहे.

CBSE 12th Board Exam 2021: बारावी परीक्षांच्या निर्णयापर्यंत पोहोचलोय, केंद्रीय शिक्षणमंत्री उच्चस्तरीय बैठकीवर काय म्हणाले?
रमेश पोखरियाल निशंक
Follow us on

CBSE 12th Board Exam 2021 नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीबाबत माहिती दिली आहे. रमेश पोखरियाल यांनी बैठकीत काय घडलं याविषयी त्यांच्या ट्विटरवर माहिती शेअर केली आहे. बारावीच्या परीक्षांच्या आयोजनाबाबत आम्ही सर्वसमावेशक निर्णयाजवळ पोहोचलो आहोत. पालक आणि विद्यार्थी यांच्या मनामधील परीक्षांविषयी शंका दूर होतील, असं देखील रमेश पोखरियाल म्हणाले. ( CBSE 12th Board exams 2021 Ramesh Pokhariyal Nishank said they are arrive collaborative decision regarding the Class 12th board exams )

राज्यांकडून सविस्तर सुचना मागवल्या

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं उच्चस्तरीय बैठकीत बारावीच्या परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्य सरकार आणि राज्य परीक्षा बोर्डांकडून अभिप्राय मागवला आहे. राज्यांनी त्यांचा बारावी परीक्षा संदर्भातील सविस्तर अहवाल त्यांची मतं 25 मे पर्यंत मला पाठवावीत, असं आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले. केंद्रीय शिक्षण मंत्रालय राज्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. बारावीच्या जून महिन्याच्या शेवटी आयोजित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट आणि इतर रोगांचं वाढत प्रमाण पाहत परीक्षा नेमकी कधी होणार याबाबत साशंकता आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करा, अन्यथा परीक्षा रद्द करा

नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री यांनी उच्च स्तरीय बैठकीत बारावीच्या परीक्षा घेण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरण करुन घ्यावं, अशी मागणी केली. लसीकरणासाठी केंद्रानं फायजर कंपनीसोबत बोलावं. असा प्रस्ताव देखील मनीष सिसोदिया यांनी मांडला.

राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सीबीएसईच्या बारावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्व परीक्षांबाबत उच्च स्तरीय बैठक पार पडली. भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची या बैठकीला उपस्थिती होती. शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे भूषवलं.केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर देखील या बैठकीला उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

CBSE 12th Board Exam 2021: बारावी परीक्षा होणार की नाही?, राज्यांची मतं जाणून घेतल्यावर निर्णय जाहीर होणार

दहावीच्या परीक्षा रद्दचं , बारावीच्या परीक्षेचं चित्र कधी स्पष्ट होणार, वर्षा गायकवाड यांनी काय सांगितलं?

( CBSE 12th Board exams 2021 Ramesh Pokhariyal Nishank said they are arrive collaborative decision regarding the Class 12th board exams )