CBSE Marking Criteria : CBSE बोर्डाच्या मार्किंग सिस्टमवर विद्यार्थी नाखूश, सुप्रीम कोर्टात आव्हान

सुप्रीम कोर्टाने 12 वी च्या बोर्ड परीक्षांसाठी CBSE बोर्डाच्या ज्या मार्किंग फॉर्म्युल्याला हिरवा झेंडा दाखवला होता, या फॉर्म्युल्याविरोधात 1152 विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. (CBSE Evaluation Criteria Student Supreme Court Stay on CBSE board marking Scheme)

CBSE Marking Criteria : CBSE बोर्डाच्या मार्किंग सिस्टमवर विद्यार्थी नाखूश, सुप्रीम कोर्टात आव्हान
Supreme Court

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने 12 वी च्या बोर्ड परीक्षांसाठी CBSE बोर्डाच्या ज्या मार्किंग फॉर्म्युल्याला हिरवा झेंडा दाखवला होता, या फॉर्म्युल्याविरोधात 1152 विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसंच या मार्किग फॉर्म्युल्यावर काही आक्षेप नोंदवत सुधारणाही सांगितल्या आहेत. याचिकेत कंपार्टमेंट-रिपीटर परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. (CBSE Evaluation Criteria Student Supreme Court Stay on CBSE board marking Scheme)

याचिकाकर्त्यांनी याचिकेत काय म्हटलंय…?

देशभरातील साडेअकराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी अ‍ॅडव्होकेट मनु मनु जेटली यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत कंपार्टमेंट, अनेक वर्ष उत्तीर्ण होण्याच्या आशेने परीक्षेला बसलेले विद्यार्थी, ड्रॉपआऊट, खाजगी विद्यार्थी यांच्यासाठीही निती बनविण्याची मागणी केली आहे. या वर्गातून परीक्षा दिलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक इत्यादींच्या आरोग्य सुरक्षेसह सर्व आवश्यक व्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा याचिकेत उपस्थित केला आहे.

03 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईला 12 वीच्या परीक्षांसाठी गुणांकन योजना तयार करुन न्यायालयासमोर मांडण्याची सूचना केली होती. मंडळाने 17 जून रोजी कोर्टाला आपले गुणांकन फॉर्म्युला दिला. हा फॉर्म्युला कोर्टाने मान्य केला आणि तो रेकॉर्डवर घेतला. परंतु याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की ही वरील नमूद केलेल्या विद्यार्थी परीक्षार्थींसाठी नवी योजना उदासीन आहे. घटनेत दिलेल्या मूलभूत हक्कांमधील समानतेच्या अधिकाराच्या कलम 14 चे हे उल्लंघन आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मंडळाच्या परिपत्रकानुसार, कंपार्टमेंट, रिपीटेशन, प्रायव्हेट, पत्रव्यवहार अभ्यासक्रम इ. च्या उमेदवारांसाठी प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, अंतर्गत मूल्यांकन वगैरे नियमित विद्यार्थ्यांसह स्वतंत्रपणे घेण्याऐवजी नियमित (रेग्युलर) विद्यार्थ्यांसोबत घेण्यात येईल. या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हरकतीही कोर्टाने मागवल्या पाहिजेत आणि त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

काय आहे मार्कांचा फॉर्म्युला?

समितीच्या अहवालानुसार शेवटच्या तीन परीक्षा बारीवीचं मार्कशीट बनविण्यासाठी अमलात आणल्या जातील. यामध्ये दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे उत्कृष्ट गुण घेऊन मार्कशीट तयार करण्यात येईल. तसंच अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेऊन वेटेज दिले जाईल.

मार्कशीट तयार करताना बारावीच्या पूर्व-बोर्ड परीक्षेच्या आणि प्रॅक्टिकलच्या गुणांनाही वेटेज दिले जाईल. अशा प्रकारे, जर आपण मूल्यमापनाच्या पूर्ण फॉर्म्युलाबद्दल बोललो तर निकाल दहावीच्या 30 टक्के, 11 वीच्या गुणांपैकी 30 टक्के आणि 12 व्या गुणांच्या 40 टक्के आधारावर 12 वीचा निकाल असेल. सीबीएसई बोर्ड निकाल तयार करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युला वापरू शकेल, अशी चर्चा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

(CBSE Evaluation Criteria Student Supreme Court Stay on CBSE board marking Scheme)

हे ही वाचा :

CBSE 12th Result Evaluation : मार्कांचा फॉर्म्युला ठरला, विद्यार्थ्यांना कसे मार्क मिळणार, वाचा सविस्तर

JNU मध्ये MBA करायचंय?, 2021-23 साठी अ‍ॅडमिशन नोटिफिकेशन जारी

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच सुरु होणार ‘जयभीम मुख्यमंत्री’ क्लासेस!

AIIMS Recruitment 2021: सीनियर रेजिडेंटच्या 106 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी मोजकेच दिवस, असा करा अर्ज…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI