RTE Portal : निवड झालेल्या बालकांच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ, आपल्या पाल्याचा शाळेतील प्रवेश निश्चित करावा

यानुसार दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली. निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना SMS देखील पाठविण्यात आलेले आहेत.

RTE Portal : निवड झालेल्या बालकांच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ, आपल्या पाल्याचा शाळेतील प्रवेश निश्चित करावा
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी गड राखणार की भाजप बाजी मारणार
Image Credit source: curly tales
रचना भोंडवे

|

May 02, 2022 | 8:29 PM

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन (Online) पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार 2022-23 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची (Entrance Process) ऑनलाईन सोडत (लॉटरी) 30 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र राज्य (Maharashtra State) शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे येथे काढण्यात आली होती. यानुसार दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली. निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना SMS देखील पाठविण्यात आलेले आहेत.

शैक्षणिक वर्ष सन 2022-23 या वर्षाकरीता आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संचालनालयाचे दिनांक 20 एप्रिल 2022 रोजीच्या पत्रानुसार 29 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. याबाबत निवड यादीतील विद्यार्थ्याना प्रवेश घेण्याकरिता आता सुधारित निर्देशांनुसार दिनांक 10 मे 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

ही मुदतवाढ शेवटची मुदतवाढ असल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पडताळणी समिती व शाळेशी संपर्क साधून दिनांक 10 मे 2022 पूर्वी आपल्या पाल्याचा शाळेतील प्रवेश निश्चित करावा, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे करण्यात आलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें