IGNOU TEE Dec 2020 Result: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल जाहीर, प्रवेश सुरु

| Updated on: Feb 23, 2021 | 5:30 PM

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (India Gandhi National Open University) ने डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या सत्र परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

IGNOU TEE Dec 2020 Result: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल जाहीर, प्रवेश सुरु
इग्नू
Follow us on

IGNOU TEE December 2020 Result: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (India Gandhi National Open University) ने डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या सत्र परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची परीक्षा दिली असेल ते विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. इग्नूच्या ignou.ac.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. इग्नूने दिलेल्या माहितीनुसार ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये गैरव्यवहार, कॉपी करणे, असा प्रकार केला असेल त्यांचा निकाल रद्द करण्यात आला आहे. बीकॉम, बीएससी, बीसीए, एमसीए, बीए, बीडीपी, एमपी आणि एमपीबी अभ्यासक्रमांचे जून सत्रातील परीक्षांचा निकाल 26 ऑक्टोबर 2020 ला जाहीर केला होता. (IGNOU TEE Dec 2020 result declared know how to check it)

निकाल कसा पाहणार

स्टेप 1. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर ignou.ac.in भेट द्या.
स्टेप 2. यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटचे होम पेज ओपन होईल, तिथे टर्म एंड परीक्षा निकालाची लिंक उपलब्ध होईल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 3. त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो खुली होईल.
स्टेप 4. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक तिथे नोंद करावा.
स्टेप 5.यानंतर तुम्हाला तुमचा निकाल उपलब्ध होईल.
स्टेप 6. निकाल उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंटआऊट सोबत ठेऊ शकता.

विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची IGNOU जानेवारी 2021 सत्रासाठी प्रवेश सुरु आहेत. ज्यांना इग्नूमध्ये (Indira Gandhi National Open University) विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल ते प्रवेश घेऊ शकतात. यासाठी त्यांना ignouadmission.samarth.edu.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. जानेवारी सत्रासाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2021 आहे. इग्नूचे अभ्यासक्रम मूक्त आणि दूरस्थ पद्धतीनं चालवले जातात. इग्नूकडून मास्टर्स डिग्री, बॅचलर्स डिग्री, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.


संबंधित बातम्या :
कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ दिवशी 2000 रुपये जमा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती

PM Kisan Scheme : 12 वाजता तुमच्या खात्यात पैसे पडणार, पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे लक्ष

IGNOU Tee Dec 2020 result declared know how to check it