
IIT मद्रासने JEE Advance चा निकाल जाहीर केला आहे. जेईई एडवांस्डमध्ये पेपर 1 आणि 2 या दोन्ही परीक्षेत एकूण 48,248 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 180,200 विद्यार्थी बसले होते. यंदा सुमारे आठ हजार मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. या परीक्षेत इंदूर येथील वेद लाहोटी याने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने 360 पैकी 355 गुण मिळाले. आतापर्यंतच्या सर्वाधिक अंकाचा हा विक्रम आहे. निकाल या jeeadv.ac.in वेबसाईटवर पाहता येणार आहे. यशाचा फार्मूला सांगताना वेद म्हणतो, मी ठरवलेला अभ्यास पूर्ण करायचो. त्याशिवाय त्या दिवशी झोपायचो नाही. अभ्यास किती तास करावा, असे काही माझे धोरण नव्हते.
इंदूर येथील वेद लाहोटी याने दहावीत 98.6 टक्के आणि बारावीत 97.6 टक्के गुण मिळाले आहेत. जेईई-मेन 2024 मध्ये, त्याने 300 पैकी 295 गुणांसह अखिल भारतीय रँक 119 मिळवला. वेद लाहोटी याचा आवडता विषय गणित आहे. त्याला गणितातील प्रश्न सोडवणे आवडते. त्याने मुलाखतीत सांगितले की, अभ्यासाचे कोणतेही वेळापत्रक निश्चित केलेले नव्हते. तो 8 तासांच्या झोपेबाबत कधीही तडजोड करत नाही. त्याला बुद्धिबळ आणि क्रिकेट खेळण्याची शौकीन आहे.
वेदसाठी त्याची आई जया लाहोटी, वडील योगेश लाहोटी आणि आजोबा आर. सी. सोमाणी हे खरे प्रेरणास्थान आहेत. तो इंदूरमधील असून त्याने परीक्षेची तयारी कोटामध्ये केली. वेदने सहाव्या वर्गात कोचिंग सुरु केली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर कोटा येथे येण्याचे ठरले. त्याला मुंबई आयआयटीमधून संगणक अभियंता व्हायचे आहे. त्याला क्रिकेट खेळणे आणि बुद्धीबळ खेळणे आवडते.
वेद लाहोटी याने यापूर्वी अनेक ठिकाणी पोरितोषिके मिळवली आहेत. त्याने ऑल्मिपियाडमध्ये देशातील पाच टॉपमध्ये क्रमांक मिळवला आहे.