
JEE Main Results 2022: JEE Mains परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. संयुक्त प्रवेश परीक्षेचा म्हणजेच JEE सत्र 1 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency) कधीही जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनो प्रवेशपत्र घेऊन तयार रहा! निकाल JEE Mains च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाहीर केला जाईल. निकाल जाहीर होताच, उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने निकाल (JEE Main Result 2022) पाहू शकतील. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मुख्य सत्र 1 परीक्षा 2022 ची अंतिम उत्तर की जारी केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जारी केलेल्या अपडेटनुसार, यावर्षी JEE Mains परीक्षा 2 सत्रांमध्ये घेतली जात आहे. ही परीक्षा 20 ते 29 जून दरम्यान घेण्यात आली. परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी तात्पुरती उत्तर की (Answer Key) 02 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाली.
JEE Mains परीक्षा (JEE Main 2022) साठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. JEE मेन 2022 सत्र 2 प्रवेशपत्र 18 जुलै 2022 पर्यंत येणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षी, जेईई मेन 2022 4 सत्रांमध्ये घेण्यात आली होती. बहुतेक सत्रांसाठी, NTA ने विक्रमी वेळेत निकाल जाहीर केले. तसेच, JEE मुख्य सत्र 2,30 जुलै रोजी संपत आहे आणि निकाल देखील ऑगस्टच्या 7 दिवसात अपेक्षित आहे.
उत्तर की तपासण्यासाठी इथे क्लिक करा.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन परीक्षेची अंतिम उत्तर की जारी केली आहे. फायनल आन्सर की जाहीर होताच लगेच निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.