AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10th -12 th students big relief| दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; बोर्डाच्या परीक्षेचे शुल्क पुणे महानगरपालिका भरणार

यामुळे विद्यार्थ्यांना गत वर्षी परीक्षेत पेपर सोडवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. यात 70 ,80 व 100गुणांच्या पेपरसाठी अर्धातास , तर 40 , 50 व60  गुणांच्या परीक्षेसाठी15 मिनिटांचा वेळा वाढवून देण्यात आला आहे.

10th -12 th students big relief|  दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; बोर्डाच्या परीक्षेचे शुल्क पुणे महानगरपालिका भरणार
STUDENT
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 22, 2021 | 2:09 PM
Share

पुणे – शहरातील यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे महानगर पालिकेने मोठा दिलासा दिला आहे . शिक्षण विभागाच्या शाळातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क महापालिका भरणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महानगरपालिकेत एकूण 44 माध्यमिक शाळा

पुणे महानगरपालिकेत एकूण 44 माध्यमिक शाळांच्या मधून 4 हजार 392 विद्यार्थी परीक्षा देणारा आहेत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला415 रुपये व तंत्रशाळेतील 200विद्यार्थ्यांचे प्रति 525असे दहावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरावे लागणार आहे. तर महापालिकेच्या शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील 449 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. या सर्वांचे वाणिज्य शाखेचे 430रुपये आणि विज्ञान शाखेसाठी प्रति 490 रुपये परीक्षा शुल्क भरले जाणार आहे.

पेपर सोडवण्यासाठी जास्तीचा वेळ कोरोनामुळे ऑनलाईन शाळा सुरु आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सरावावर झाला आहे.यामुळे विद्यार्थ्यांना गत वर्षी परीक्षेत पेपर सोडवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. यात 70 ,80 व 100गुणांच्या पेपरसाठी अर्धातास , तर 40 , 50 व60  गुणांच्या परीक्षेसाठी15 मिनिटांचा वेळा वाढवून देण्यात आला आहे.

वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. यामध्ये दहावीच्या परीक्षा 15मार्च ते4  एप्रिल2022 पर्यंत होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च 2022 पर्यंत पार पडणार आहेत. सकाळी साडेदहाला पेपर सुरु केले जाणार आहेत.

Shocking | मोक्षप्राप्तीचा नाद! बायको-मुलांची हत्या, स्वतःला संपवण्याआधी ११ पानी सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं? वाचा

VIDEO : Pune |परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार उघड, टीईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये पडून

Kharmas 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी खरमास दरम्यान या 6 गोष्टी करा

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?