AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shocking | मोक्षप्राप्तीचा नाद! बायको-मुलांची हत्या, स्वतःला संपवण्याआधी ११ पानी सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं? वाचा

२० डिसेंबरला घडलेल्या या घटनेनंतर आता लेकरं-बाळांसह बायको आणि स्वतःलाही संपवणाऱ्याची ११ पानी सुसाईड नोट समोर आली आहे. या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. पोलीसही हे सगळं हत्याकांड पाहून चक्रावून गेलेत. तर हरियाणातील ज्या गावात हे घडलंय, त्या गावातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.

Shocking | मोक्षप्राप्तीचा नाद! बायको-मुलांची हत्या, स्वतःला संपवण्याआधी ११ पानी सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं? वाचा
'मोक्ष' प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 2:01 PM
Share

ना कुटुंबाची काळजी, ना जगण्याची चिंता आणि ना मरण्याचं भय! संसाराच्या सगळ्या बंधनातून मुक्त होणं… जगण्या-मरण्यातून स्वतंत्र होणं… म्हणजे मोक्ष!, पोथीपुराणात, पूर्वजांनी सांगून ठेवलेली ही मोक्षप्राप्तीची व्याख्या असेलही कदाचित. पण या मोक्ष प्राप्तीच्या येडा नाद लागलेल्या एकानं स्वतःच्या निरागस जुळ्या मुली एक लहान मुलगा आणि पत्नीसह स्वतःलाही संपवलंय. अत्यंत धक्कादायक आणि अंगवार काटा आणणरी ही घटना घडली आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये. २० डिसेंबरला घडलेल्या या घटनेनंतर आता लेकरं-बाळांसह बायको आणि स्वतःलाही संपवणाऱ्याची ११ पानी सुसाईड नोट समोर आली आहे. या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. पोलीसही हे सगळं हत्याकांड पाहून चक्रावून गेलेत. तर हरियाणातील ज्या गावात हे घडलंय, त्या गावातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.

आधी झोपेच्या गोळ्या, मग लोखंडी रॉड!

आधी कुटुंबातल्या लोकांना झोपेच्या गोळ्या देऊन नंतर त्यांचा गळा लोखंडी रॉडनं चिरण्यात आला होता. त्यानंतर हे हत्याकांड करणाऱ्या रमेशची ११ पानी सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. या मोक्षप्राप्तीच्या नादात त्यानं आपल्या कुटुंबाला संपवल्याचं म्हटलंय. शिवाय ‘आता सगळं शांत झालं असून, सगळे शांतपणे आता झोपले आहेत’, असंही भिंतीवर लिहून ठेवलं होतं. या हत्याकांडानंतर आत्महत्या केलेल्या रमेश कृतीनं संपूर्ण हरियाणा हादरुन केलंय.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?

मोक्ष मिळवण्यासाठी हादरवणारं पाऊल उचलेल्या रमेश हत्याकांड केल्यानंतर सुसाईड नोट लिहिली. त्यानंतर स्वतः जीव देण्यासाठी तो घराबाहेर पडला. हत्येनंतर आणि आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या ११ पानी सुसाईड नोटमध्ये रमेश यांनी लिहिलं होतं की,…

मला मोक्ष हवा आहे. मी लिहिलेली ही गोष्ट जो कुणी वाचत आहे, त्यानं मला अपराधी समजू नये. रात्रीचे ११ वाजलेत.

आता ना दुःख आहे, ना भय आणि नाही थंडी वाजतेय. हे सगळं करण्यासाठी मला दोन तास लागले. सगळ्यांना मी झोपेच्या गोळ्या दिल्यात. आज माझं अक्षरही बदल्यासारखं वाटतंय.

हे मी अचानक केलंय, अशातला भाग नाही. मला ना कुणीची भीती होती आणि नाही कुणाचं कर्ज माझ्यावर होतं. ५० हजारपर्यंत कमावतोय. आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण करुन झाली आहेत. पण काय मिळवलं?

मी लहानपणापासूनच सगळ्यांपेक्षा वेगळा होतो. जेव्हा जग कळू लागलं, तेव्हा संसारीक सुखापेक्षा मी दुनियेला वेगळ्याचं नजरेतून पाहिलं. दुनियेचं खरं रुप मला कळलं. माझं मन गेल्या १५ वर्षांपासून संन्यासी बनलं होतं. मला मोक्षप्राप्ती हवी होती. पण संसारातून मी मुक्त होऊ शकलो नाही. हळूहळू माझे विचार बदलू लागले. माझी पत्नी सविताही माझ्यासारखीच आहे. जे आहे, त्यातच खूश राहायचं, या माझ्यासारख्याच विचारांची ती होती. असो..

आम्ही आता भावाला क्षमा केली आहे. मी तर फकीर होऊन संन्यासी झाल्यासारखा जगत होतो. पत्नीनंही माझ्या हो ला हो केलं. शेवटपर्यंत मला साथ देण्याचं तिनं म्हटलं. गेल्या १०-१५ वर्षात अनेकदा घरातून निघून संन्यास घेण्याचा मी विचार करुन झालो होतो. पण दोन वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडलेल्या घटनेनं मला आणखी बळ दिलं. शरीर थकलं होतं. घसा त्रास देऊ लागला होता. श्वास घेताना, खाताना, झोपताना, बोलताना, प्रत्येक वेळी डोकं एकदम सुन्न होऊन जायचं.

गेल्या वर्षी मी सगळ्यांशी संन्यास मागितला. मला मुक्त करा, असं म्हणत अनेकदा मी पत्नीसमोर रडायचो. पण ती मला थांबवायची. अखेर गेल्या ४ ते ५ दिवसांत डोक्यानं बार मानली. मी पत्नीला सांगितलं. तिनं यावेळी माझं म्हणणं मान्य केलं आणि अखेरच्या समयी माझ्यासोबत राहण्याचं वचन घेतलं. सगळ्यांची माफी मागतो.

जयदेवजी मी तुम्हाला खूप त्रास देतोय. पण निष्पाप आणि साधीभोळी सवितासोबत निरागस मुलांना या मतलबी दुनियेत मी एकटं नाही सोडू शकत. त्यांनी सोबत घेऊन जातो आहे. संदीप तुझीही माफी मागतो. मागच्या वर्षी तुलाही सांगितलं होतं की, पण हे सगळं होणारच होतं. मी रस्त्यावर जातोय. शरीरवरील ओझं हलकं करायचंय. सकाळचे चार वाजलेत. घरातून बाहेर पडलोय. कडाक्याच्या थंडीत तुम्हा सगळ्यांना अडचणीत टाकून चाललोय. मला माफ करा. तुम्हा सगळ्यांची मी क्षमा मागतो.

तुमचा रमेश!

पोलीस तपास करताना

एका रात्रीत खेळ खल्लास!

पत्नी आणि तीन मुलांची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना हरियाणातील हिसारमध्ये घडली होती. २० डिसेंबरला ही घटना उघडकीस आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, रमेशने झोपेच्या गोळ्या आधी कुटुंबीयांना दिला. त्यानंतर कुदळ डोक्यात घालून पत्नी आणि तिन्ही मुलांची रात्री हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या तीन मुलांमध्ये दोन जुळ्या मुलींचा समावेश होते. नंतर विजेच्या तारेला गळफास घेऊन स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र विजेचा शॉक लागला नाही. यानंतर बारवाला रोडवर अज्ञात वाहनाखाली उडी घेत त्याने आपला जीव दिला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.