Thane : कर्करोगाशी झुंज, त्यानंतर दहावीची परीक्षेची तयारी; मिळविले 81.6 टक्के गुण

| Updated on: Jun 18, 2022 | 2:22 PM

कर्करोग झाल्याचं कानावर पडताचं अनेकजण घाबरून जातात. परंतु दिव्याचा जिद्दीला सलाम करावा लागणार आहे. मागच्या वर्षी दहावीचं वर्षे सुरू झालं. त्याचंवेळेस दिव्याला कर्करोग झाल्याचं निदान डॉक्टरांनी सांगितलं.

Thane : कर्करोगाशी झुंज, त्यानंतर दहावीची परीक्षेची तयारी; मिळविले 81.6 टक्के गुण
कर्करोगाशी झुंज, नंतर दहावीची तयारी, मिळविले 81.6 टक्के गुण
Image Credit source: twitter
Follow us on

ठाणे : काल दहावीचा निकाल (SSC Result) जाहीर झाला त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी (Student) आपला आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा केला. कारण कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यास केला होता. विद्यार्थ्यांचा निकाल कसा येणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण काल समाधानकारक निकाल जाहीर होताच. महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण होतं. ठाण्यातील सरस्वती वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातील सोळा वर्षीय दिव्या पवळे (Divya Pawale) हिने एसएससी परीक्षेत 81.6% गुण मिळवले. कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर तिने चांगले मार्क मिळविल्याने पालकांसह तिच कौतुक केलं जातं. दिव्याला गेल्यावर्षी मे महिन्यात कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. जानेवारी महिन्यानंतर तिने जिद्दीने अभ्यास करून चांगले गुण मिळविले आहेत.

दिव्याचा जिद्दीला सलाम करावा लागेल

कर्करोग झाल्याचं कानावर पडताचं अनेकजण घाबरून जातात. परंतु दिव्याचा जिद्दीला सलाम करावा लागणार आहे. मागच्या वर्षी दहावीचं वर्षे सुरू झालं. त्याचंवेळेस दिव्याला कर्करोग झाल्याचं निदान डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळी तिच्यासह घरचे देखील हादरून गेले. दिव्याला वारंवार रूग्णालयात घेऊन जावं लागत होतं. त्यामुळे पालकांना सुध्दा खूप त्रास झाला. टी-लिम्फोब्लास्टिक लिम्फोमा हा आजार झाला होता. केमोथेरपी आणि रक्त संक्रमणासाठी तिला सतत रुग्णालयात जावे लागतं होते. याचा तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर प्रचंड शारीरिक मानसिक आणि भावनिक ताण पडला होता. डॉक्टरांनी चांगले उपचार केल्याने तिचा आजार जानेवारी महिन्यात संपुष्टात आला. त्यानंतर तिने अभ्यासाला सुरूवात केली.

पालकांना उत्तीर्ण होण्यार याची खात्री होती

जानेवारी महिन्यात दिव्याचा आजार बरा झाला. त्यानंतर तिने वर्षभराचा अभ्यास करायला सुरूवात केली. त्यावेळी दिव्याला तिच्या घरच्यांनी देखील मदत केली. त्यानंतर काही दिवसांतच तिने तिची सर्व मेहनत घेतली आणि खूप समर्पित वृत्तीने अभ्यास केला. ती अभ्यासात नेहमी अग्रही राहिली आहे असं दिव्याच्या आईने सांगितलं आहे. दिव्या तिच्या पालकांना उत्तीर्ण होण्यार याची खात्री होती. पण तिने मिळविलेल्या मार्कमुळे घरातलं वातावरण देखील बदलून गेलं आहे. तिला शिक्षकांकडूनही पाठिंबा मिळाला आहे. दिव्याने अद्याप ठरवलेले नाही की तिला कोणत्या क्षेत्रात करिअरच्या करायचे आहे.

हे सुद्धा वाचा

परंतु तिची लवचिकता आणि शौर्य पाहता, ती तिच्या मनात असलेले काहीही साध्य करू शकते असंही तिच्या आईने सांगितले आहे.