UGC NET Exam 2022 : यूजीसी ‘नेट परीक्षेचे’ अर्ज ‘नीट भरा’ ! अर्ज प्रक्रिया सुरु, अर्ज शुल्क, शेवटची तारीख वगैरे वगैरे

| Updated on: May 01, 2022 | 12:56 PM

यूजीसी नेट परीक्षा 82 विषयांमध्ये संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांनी व्यवस्थित आणि वेळेत अर्ज जमा केलेला आहे त्या अर्जदारांना युजीसी नेट प्रवेश पत्र 2022 मिळेल.

UGC NET Exam 2022 : यूजीसी नेट परीक्षेचे अर्ज नीट भरा ! अर्ज प्रक्रिया सुरु, अर्ज शुल्क, शेवटची तारीख वगैरे वगैरे
UGC NET Exam 2022
Image Credit source: facebook
Follow us on

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने यूजीसी नेट परीक्षा 2022 (UGC NET Exam 2022) साठीची अर्ज प्रक्रिया सुरु केलीये. जून सत्र परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी. अर्जदार यूजीसी नेट अर्ज (UGC NET 2022 Applicaion ) ऑनलाइन पद्धतीनेच जमा करू शकतात. यूजीसी नेट परीक्षा 82 विषयांमध्ये संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांनी व्यवस्थित आणि वेळेत अर्ज जमा केलेला आहे त्या अर्जदारांना युजीसी नेट प्रवेश पत्र 2022 मिळेल.

UGC NET 2022 साठी अर्ज कसा करावा

एनटीए यूजीसी नेट ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

होम पेजवर खाली यूजीसी नेट डिसेंबर 2021 आणि जून 2022 साठी ऑनलाइन अर्ज नोंदणी या लिंकवर क्लिक करा.

हे सुद्धा वाचा

यूजीसी नेट रजिस्ट्रेशन 2022 पूर्ण करण्यासाठी तपशील भरा आणि पासवर्ड तयार करा.

यूजीसी नेट 2022 अर्ज क्रमांक उमेदवारांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे.

आपल्या यूजीसी नेट 2022 अप्लिकेशन नंबर आणि पासवर्डवर लॉग इन करा आणि दिलेला कोड सबमिट करा.

युजीसी नेट अर्ज 2022 भरा.

आता स्कॅन केलेला फोटो आणि सही अपलोड करा.

यूजीसी नेट 2022 नोंदणी शुल्क भरा.

यूजीसी नेट ऑनलाइन फॉर्म 2022 सबमिट करण्याआधी पडताळून पहा, सबमिट करा.

फॉर्मची प्रिंट आऊट काढा आणि जवळ ठेवा.

अर्ज शुल्क

यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या General कॅटेगरीतील उमेदवारासाठी ११०० रुपये, EWS/OBC-NCL ५५० आणि SC/ST/ PWD / Transgender साठी २७५ शुल्क आहे. अर्ज करायची शेवटची तारीख २० मे २०२२ आहे. अर्ज दुरुस्त करण्यासाठीची विंडो २१ मे ते २३ मे या कालावधीत खुली करण्यात येणार आहे. जूनमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची सविस्तर माहिती लवकरच देण्यात येणार आहे त्याचबरोबर परीक्षेआधी ऍडमिट कार्ड सुद्धा दिलं जाईल. वेळोवेळी मिळणाऱ्या अपडेट्ससाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहावी.