
मुंबई जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघाचा यात समावेश होतो.
उत्तर मुंबई लोकसभा निकाल – North Mumbai Lok Sabha Results : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.32 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात फाईट झाली.
| पक्ष | उमेदवार | निकाल |
|---|---|---|
| भाजप/शिवसेना | गोपाळ शेट्टी (भाजप) | विजयी |
| काँग्रेस/ राष्ट्रवादी | उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) | पराभूत |
| अपक्ष/इतर | पराभूत |
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निकाल – North West Mumbai Lok Sabha Results :उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 54.71 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसकडून संजय निरुपम यांच्यात लढत झाली.
| पक्ष | उमेदवार | निकाल |
|---|---|---|
| भाजप/शिवसेना | गजानन कीर्तिकर (शिवसेना) | विजयी |
| काँग्रेस/ राष्ट्रवादी | संजय निरुपम (काँग्रेस) | पराभूत |
| अपक्ष/इतर | पराभूत |
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा निकाल – North East Mumbai Lok Sabha Results : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 57.15 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 6 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतदान वाढल्यानं धाकधूक वाढली. वाढलेला मतदार कोणाकडे जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. या मतदारसंघात भाजपकडून मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय दिना पाटील या दोघांमध्येच प्रमुख लढत झाली. मनसेनं उमेदवारी दिली नसल्यानं यावेळी इथं दुहेरी लढत झाली.
| पक्ष | उमेदवार | निकाल |
|---|---|---|
| भाजप/शिवसेना | मनोज कोटक (भाजप) | विजयी |
| काँग्रेस/ राष्ट्रवादी | संजय दीना पाटील (राष्ट्रवादी) | |
| अपक्ष/इतर | संभाजी शिवाजी काशीद (VBA) |
उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल – North Central Lok Sabha Results : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 53 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात भाजपकडून पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात लढत झाली. प्रिया दत्त यांनी सुरुवातीला निवडणूक लढण्यास नकार दिला होता. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना निवडणूक लढवण्यास सांगितल्याने त्या मैदानात उतरल्या.
| पक्ष | उमेदवार | निकाल |
|---|---|---|
| भाजप/शिवसेना | पूनम महाजन (भाजप) | विजयी |
| काँग्रेस/ राष्ट्रवादी | प्रिया दत्त (काँग्रेस) | पराभूत |
| अपक्ष/इतर | पराभूत |
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निकाल – South Central Lok Sabha Results :दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे सुमारे 55.35 टक्के मतदानाची नोंद झाली. शिवसेनेकडून राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्यात यंदा लढत झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांनी दोन वेळा खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता.
| पक्ष | उमेदवार | निकाल |
|---|---|---|
| भाजप/शिवसेना | राहुल शेवाळे (शिवसेना) | विजयी |
| काँग्रेस/ राष्ट्रवादी | एकनाथ गायकवाड (काँग्रेस) | पराभूत |
| अपक्ष/इतर | डॉ. संजय भोसले (VBA) | पराभूत |
दक्षिण मुंबई लोकसभा निकाल – South Mumbai Lok Sabha Results :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसकडून मिलिंद देवरा अशी लढत पाहायला मिळाली. दक्षिण मुंबई हा उच्चभ्रू परिसर आहे. यामध्ये वरळी, मलबार हिलसह 6 विधानसभांचा समावेश आहे. वरळी, शिवडीमध्ये शिवसेना, मलाबार हिल, कुलाबामध्ये भाजप, मुंबादेवीमधून काँग्रेस तर भायखळामधून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचा आमदार आहे.
| पक्ष | उमेदवार | निकाल |
|---|---|---|
| भाजप/शिवसेना | अरविंद सावंत (शिवसेना) | विजयी |
| काँग्रेस/ राष्ट्रवादी | मिलिंद देवरा (काँग्रेस) | पराभूत |
| अपक्ष/इतर | डॉ. अनिल कुमार (VBA) | पराभूत |