UP local body poll 2023 : कर्नाटकमध्ये हार, पण उत्तर प्रदेशात भाजपाचा डंका

| Updated on: May 13, 2023 | 2:55 PM

UP local body poll 2023 : नगर पंचायती, नगर पालिकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळताना दिसतय. योगी आदित्यनाथ यांच्या कामकाजावर तिथल्या जनतेने विश्वास दाखवलाय असं दिसतय. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा सुद्धा निवडणूक रिंगणात आहे.

UP local body poll 2023 : कर्नाटकमध्ये हार, पण उत्तर प्रदेशात भाजपाचा डंका
UP Election Result Yogi adityanath
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांचे निकाल जाहीर होतायत. मतमोजणी सुरु आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व दिसून येतय. महापौरपदाच्या तीन जागांवर भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या डाटानुसार, लखनौ, मथुरा आणि बरेलीमध्ये भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

मथुरेत भाजपाचे विनोद अग्रवाल आघाडीवर आहेत. त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या राजा मोहत्सीम अहमद यांच्यावर आघाडी घेतली आहे. बरेलीत भाजपाचे उमेश गौतम आघाडीवर आहेत. लखनौमध्ये भाजपाच्या सुष्मा खरकवाल यांनी समाजवादी पार्टीच्या उमेदवारावर आघाडी घेतलीय.

कुठल्या पदांसाठी झालं मतदान

उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 17 महापौर, 1420 नगरसेवक, नगर परिषदांचे 199 अध्यक्ष, नगर पालिका परिषदांचे 5327 सदस्य, नगर पंचायतीचे 544 अध्यक्ष आणि नगर पंचायतीच्या 7178 सदस्यांच्या निवडीसाठी दोन टप्प्यात मतदान झालं होतं. निवडणुकीत 17 महापौर, 1401 नगरसेवक निवडीसाठी मतदान झालं. 19 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात 4 मे आणि 11 मे रोजी मतदान झालं होतं.

83,378 उमेदवार रिंगणात

शाहजहानपूरने पहिला महापौर निवडण्याासठी मतदान केलय. मेरठ आणि अलीगढमध्ये 2017 साली बहुजन समाज पार्टीचे महापौर होते. अन्य ठिकाणी सर्वत्र भाजपाची सत्ता आहे. एकूण 162 जन प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली. 14,522 जागांसाठी एकूण 83,378 उमेदवार रिंगणात होते.

किती नगरसेवकांची निवड बिनविरोध?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा 11 मे रोजी पार पडला. एकूण 38 जिल्ह्यात 53 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात 37 जिल्ह्यात 52 टक्के मतदारांनी मतदान केलं होतं. 1401 नगरसेवक निवडण्यासाठी मतदान होत आहे, 19 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली.