AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Final Opinion Poll: : उत्तर प्रदेशात कोणत्या टप्प्यात कोण बाजी मारणार? सात टप्प्यातील नेमकं चित्रं काय?; वाचा ‘टीव्ही9 ओपिनियन फायनल पोल’

Tv9 च्या ओपिनियन पोलमधील पहिल्या सात टप्प्याबद्दल काही खास गोष्टी निदर्शनास येत आहेत. यूपी विधानसभा निवडणुकीत (Up Elections 2022) भाजपला (Bjp) पहिल्या टप्प्यात 28-30 जागा मिळू शकतात. समाजवादी पक्षाला 22-26 जागा मिळू शकतात.

TV9 Final Opinion Poll: : उत्तर प्रदेशात कोणत्या टप्प्यात कोण बाजी मारणार? सात टप्प्यातील नेमकं चित्रं काय?; वाचा 'टीव्ही9 ओपिनियन फायनल पोल'
उत्तर प्रदेशात कुणाची सत्ता?
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 7:03 PM
Share

उत्तर प्रदेश : जसजसे निवडणुकांचे ओपिनियन पोल (Elections Opinion poll) समोर येऊ लागलेत तसतशी निवडणूक आणखी रंगत होत चालली आहे. Tv9 च्या ओपिनियन पोलमधील पहिल्या सात टप्प्याबद्दल काही खास गोष्टी निदर्शनास येत आहेत. यूपी विधानसभा निवडणुकीत (Up Elections 2022) भाजपला (Bjp) पहिल्या टप्प्यात 28-30 जागा मिळू शकतात. समाजवादी पक्षाला 22-26 जागा मिळू शकतात. BAC च्या खात्यात 4-5 जागा जाऊ शकतात. त्याचबरोबर काँग्रेससह अन्य पक्षांना खातेही उघडता येणार नाही, असा ओपिनियन पोल समोर आला आहे. तर यूपी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपला 20-23 जागा मिळू शकतात, असे मत सर्वेक्षणातून समोर आले आहे. समाजवादी पक्षाला 24-26 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर बसपाला 7-8 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 0-1 आणि इतर पक्षांचे खातेही उघडता येणार नाही. तसेच यूपी विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 34-36 जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात. त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यात समाजवादी पक्षाला 17 ते 18 जागा मिळू शकतात. त्याचवेळी बसपाच्या वाट्याला ४-६ जागा जाऊ शकतात. त्याचबरोबर काँग्रेस आणि इतरांना 0-1 जागा मिळू शकतात.

चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातले ओपिनियन पोल

चौथ्या टप्प्यात भाजपला पुन्हा आघाडी मिळण्याची शक्यता TV9 च्या ओपिनियन पोलमधून समोर आली आहे. या टप्प्यात 59 जागांचा समावेश आहे. या टप्प्यात भाजपच्या वाट्याला 34-35 जागा येऊ शकतात. समाजवादी पक्षाला 18-20 जागा मिळू शकतात. त्याचवेळी बसपाला 1-3 जागा आणि काँग्रेसला 1-2 जागा मिळू शकतात. इतर पक्षाला खातही उघडता येत नाहीत. पाचव्या टप्प्यात भाजपला 33-37 जागा मिळू शकतात, असे जनमत सर्वेक्षणातून समोर आले आहे. या टप्प्यात समाजवादी पक्षाला 16-18 जागा मिळू शकतात. बसपा आणि काँग्रेसला 1-3 जागा मिळू शकतात. त्याचवेळी 0-1 जागा इतर पक्षांच्या खात्यात जाऊ शकतात.

पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातले ओपिनियन पोल

यूपी विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 35-36 मते मिळू शकतात असे दिसून आले आहे. त्याचवेळी समाजवादी पक्षाच्या खात्यात 19-20 जागा जाऊ शकतात. बसपाला 2-3 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर काँग्रेस आणि इतरांचे खातेही उघडता येणार नाही. सातव्या टप्प्यात भाजपला 21-24 जागा मिळू शकतात, असे जनमत सर्वेक्षणातून समोर आले आहे. या टप्प्यात समाजवादी पक्षाला बळ मिळू शकते. सातव्या टप्प्यात सपाला 28-30 जागा मिळू शकतात. बसपाला 2-3 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर काँग्रेस आणि इतर पक्षांना या टप्प्यात काहीच जागा मिळणार नसल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे.

TV9 Final Opinion Poll: यूपीत भाजपच नंबर वन, सपा दुसऱ्या क्रमांकावर, बसपा आणि काँग्रेसची सर्वात वाईट अवस्था; टीव्ही9चा ओपिनियन पोल काय सांगतो?

TV9 Final Opinion Poll : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार समाजवादी पार्टीसोबत, भाजप चौथ्या क्रमांकावर

PHOTO | मंत्री धनंजय मुंडे पारावरच्या पंगतीत, परळीतल्या हरिनाम सप्ताहात काल्याचा प्रसाद घेतला

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.