TV9 Final Opinion Poll : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार समाजवादी पार्टीसोबत, भाजप चौथ्या क्रमांकावर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या ओपिनियन पोलमध्ये 6 हजार लोकांना सर्व्हे सॅम्पलम्हणून सहभागी करण्यात आलं होतं. या पोलचा मार्जिर ऑफ एरर 3 टक्के आहे. तर हा पोल 95 टक्के विश्वासार्ह ठरेल असा अंदाज आहे.

TV9 Final Opinion Poll : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार समाजवादी पार्टीसोबत, भाजप चौथ्या क्रमांकावर
उत्तर प्रदेशात कुणाची सत्ता?
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 6:57 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Assembly Election) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान एकूण 7 टप्प्यात उत्तर प्रदेशात मतदान पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी घोषित होणार आहे. अशावेळी उत्तर प्रदेशातील मतदारांच्या मनात काय आहे? यंदा मतदारांचा कल कुणाकडे आहे? खास करुन मुस्लिम मतदार (Muslim Voter) कुणाच्या हातात सत्ता देण्याचा विचार करत आहेत? त्याचा एक अंदाज ओपिनियन पोलमधून आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहेत. टीव्ही 9 भारतवर्षची टीम पोलस्ट्रॅट यांनी केलेला फायनल ओपिनियन पोल (Opinion Poll) अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण मतदानाच्या 60 तास आधी हा पोल समोर आला आहे.

टीव्ही 9 भारतवर्षच्या सर्वेनुसार यंदा मुस्लिम मतदार समाजवादी पक्षाच्या मागे उभे राहताना दिसून येत आहेत. 66.9 टक्के मुस्लिम मतदार समाजवादी पार्टीला विजयी करण्यासाठी मतदान करेल असा अंदाज आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी बहुजन समाज पार्टी आहे. बसपाच्या मागे 11.1 टक्के मुस्लिम मतदार आहेत. तर तिसऱ्या स्थानावर काँग्रेस असून, 10.1 टक्के मुस्लिम मतदार काँग्रेसला मत देतील. भाजपला केवळ 2.9 टक्के मुस्लिम मतदार मद देताना या सर्व्हेमध्ये दिसून येत आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या ओपिनियन पोलमध्ये 6 हजार लोकांना सर्व्हे सॅम्पलम्हणून सहभागी करण्यात आलं होतं. या पोलचा मार्जिर ऑफ एरर 3 टक्के आहे. तर हा पोल 95 टक्के विश्वासार्ह ठरेल असा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

TV9 भारतवर्षच्या सर्व्हे नुसार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप सत्ता काबिज करताना दिसत आहे. मात्र, भाजपच्या जागेत मोठी घट होण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात 205 ते 229 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर समाजवादी पार्टी भाजपला टक्कर देताना दिसून येत आहे. आपल्या जागांमध्ये मोठी वाढ करत समाजवादी पार्टी 144 ते 159 जागांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वक्त करण्यात आला आहे. तर बसपाला 21 ते 31 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय भासत असून, काँग्रेसला केवळ 2 ते 7 जागा मिळतील. त्याचबरोबर इतर पक्षांनाही फक्त शून्य ते दोन जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला सर्वाधिक पसंती?

या ओपिनियन पोलमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबतही लोकांचं मत जाणून घेण्यात आलं. त्यानुसार उत्तर प्रदेशातील जनता विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामावर खूश असल्याचं दिसून येत आहे. त्यानुसार 44.3 टक्के लोकाची पसंती योगी आदित्यनाथ यांना मिळत आहे. तर अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री म्हणून 37.8 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे.

इतर बातम्या :

PM Narendra Modi : कोरोना काळातील स्थलांतरावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसवर गंभीर आरोप, काय म्हणाले मोदी?

PM Modi Speech in Parliament: इन्हे आईना मत दिखाओ, वो आईना भी तोड देंगे, मोदींचा शेरो शायरीतून काँग्रेसवर घणाघाती हल्ला

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.