PM Narendra Modi : तुम्ही हे मोठं पाप केलं, पंतप्रधानांच्या निशाण्यावर महाराष्ट्र काँग्रेस, वाद वाढणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करुन केली. 'देशानं आदरणीय लता दीदीला गमावलं आहे. एवढा मोठा काळ ज्यांच्या आवाजाने देशाला मोहित केलं, देशाला प्रेरित केलं, देशाला भावनांनी भरलं. मी आज आदरणीय लतादीदींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो', असं मोदी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकटाच्या काळात पहिल्या लाटेवेळी कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

PM Narendra Modi : तुम्ही हे मोठं पाप केलं, पंतप्रधानांच्या निशाण्यावर महाराष्ट्र काँग्रेस, वाद वाढणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 7:22 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विचार प्रकट करणाऱ्या सर्व पक्षांच्या सदस्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली अर्पण करुन केली. ‘देशानं आदरणीय लता दीदीला गमावलं आहे. एवढा मोठा काळ ज्यांच्या आवाजाने देशाला मोहित केलं, देशाला प्रेरित केलं, देशाला भावनांनी भरलं. मी आज आदरणीय लतादीदींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो’, असं मोदी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकटाच्या (Corona Outbreak) काळात पहिल्या लाटेवेळी कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश जेव्हा लॉकडाऊनचं पालन करत होतं. who सल्ला देत होतं. तज्ज्ञ म्हणत होते की जो तिथे आहे तिथेच थांबा. कारण माणूस एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि तो कोरोना संक्रमित असेल तर त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तेव्हा काँग्रेसनं काय केलं, तर मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. कामगार, मजुरांना तिकीटं देण्यात आली. लोकांना प्रेरित करण्यात आलं. महाराष्ट्रात आमच्यावर जो बोज आहे तो जरा कमी व्हावा. तुम्ही जा… तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात. तुम्ही बिहारचे आहात. जा… तिथे कोरोना पसरवा. तुम्ही हे मोठं पाप केलं. अफरातफरीचं वातावरण निर्माण केलं. कामगार बांधवांना अनेक कठीण प्रसंगात ढकलून दिलं’, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केलीय.

दिल्लीतील आप सरकारवरही गंभीर आरोप

दिल्लीतील सरकारनं तर गाड्यांवर माईक, स्पीकर लावून झोपडीत राहणाऱ्या कामगार, मजुरांना त्यांच्या गावी जाण्यास सांगितलं त्यांच्यासाठी बसेस दिल्या. पण त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून त्यांच्यासमोर अडचण निर्माण केली. त्याचं कारण असं झाली की उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये कोरोनाचा जास्त प्रसार नव्हता. पण तिथे कोरोना संकट वाढवण्याचं पाप काँग्रेसनं केलं, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी यांनी केलाय.

‘भारताने जगाचं नेतृत्व करण्याची संधी गमावता कामा नये’

त्याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘दुसऱ्या महायुद्धानंतर जगात मोठा बदल झाला. मी स्पष्टपणे पाहतोय की कोरोना संकटानंतर जग एक नव्या व्यवस्थेकडे पुढे जात आहे. एक असा टर्निंग पॉईट आहे. आपण भारताच्या रुपाने ही संधी गमावता नये. भारताने एका लिडरशिप रोलमध्ये स्वत:ला कमी समजलं नाही पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही एक संधी आहे. देश जेव्हा स्वातंत्र्याची शंभरी साजरी करेल तेव्हा आपण सामर्थ्यवान होऊ हा संकल्प केला पाहिजे’, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप सरकारच्या योजनांचा पाढा मोदींनी वाचला

‘गेल्या काही वर्षात अनेक क्षेत्रात आपण मजबुतीने पुढे आलो. पीएम आवास योजना, गरीबांना राहण्यासाठी घरे असावे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पण आपण त्याला गती दिली. त्यामुळे गरीबांचे घर सुद्धा लाखोंपेक्षा अधिक किमतीचे होत आहे. ज्या गरीबाला पक्के घर मिळते तोही लखपतीच्या श्रेणीत येतो. गरीबांच्या घरात शौचालये आले आहेत. त्यामुळे उघड्यावर शौच करणं बंद झालं आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर गरीबाच्या घरात उजेड आला तर त्याचा आनंद देशाचा आनंद वाढवतो. गरीबाच्या घरात गॅस कनेक्शन असेल, चुलीमुळे होणाऱ्या धुरापासून त्याला मुक्ती मिळेल तर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच असतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

Modi | ‘आपका प्यार अजरामर रहे’ असं मोदींनी म्हटलं आणि एकच हशा पिकला! नेमकं घडलं काय?

Lata Mangeshkar Memorial : ‘राजकारण करु नका म्हणता आणि स्वत:च केंद्राकडे बोट दाखवता’, लतादीदींच्या स्मारकावरुन राम कदमांचा राऊतांना टोला

Non Stop LIVE Update
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....