AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election: भाजपच्या ‘या’ नेत्याला महिला सुरक्षारक्षकांचं संरक्षण कवच; वाचा, कारण काय?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. (women soldiers of central force will be posted under the protection of Suvendu Adhikari)

West Bengal Election: भाजपच्या 'या' नेत्याला महिला सुरक्षारक्षकांचं संरक्षण कवच; वाचा, कारण काय?
Suvendu Adhikari
| Updated on: Mar 31, 2021 | 12:14 PM
Share

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही नेत्यांना तर झेड प्लस सुरक्षाही देण्यात आली आहे. नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढणारे भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या सुरक्षेत तर थेट महिला जवानांचा समावेश करण्यात आला आहे. (women soldiers of central force will be posted under the protection of Suvendu Adhikari)

पश्चिम बंगालमध्ये उद्या 1 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील 30 जागांसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या लढतीमुळे लक्ष्यवेधी ठरलेल्या नंदीग्राममध्येही उद्या मतदान होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. उद्या राज्यात मतदान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकारी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी यांना झेड सुरक्षा आहे. आता त्यांच्या सुरक्षा ताफ्यात सीआरपीएफच्या 10 महिला जवानांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महिला जवान अधिकारी यांच्यासोबत राहणार असून त्यांची सुरक्षा करणार आहेत.

झेड सुरक्षा

अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने अधिकारी यांना झेड सुरक्षा दिली होती. अधिकारी यांच्यासोबत सदैव सीआरपीएफचे जवान तैनात असतात. या सुरक्षेअंतर्गत अधिकारी यांच्या सुरक्षा ताफ्यात सीआरपीएफचे 6-7 सशस्त्र जवानांची एक मोबाईल टीम, एक पायलट वाहन आणि एक एस्कॉर्टच्या वाहनांची सुविधा आहे.

म्हणून महिला सुरक्षारक्षक तैनात

शुभेंदू अधिकारी निवडणूक प्रचारासाठी ज्या ज्या भागात जात असतात त्या ठिकाणी त्यांना महिला मतदारांचा मोठा गराडा पडत असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्या आहेत. महिलांना पुढे करून अधिकारी यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच त्यांच्या सुरक्षा ताफ्यात महिला जवानांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल दौऱ्यासाठी त्यांना बुलेटप्रुफ कार देण्यात आली होती. (women soldiers of central force will be posted under the protection of Suvendu Adhikari)

संबंधित बातम्या:

West Bengal Election: ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये हरणार; प्रशांत किशोर यांच्या सर्वेक्षणातील डेटा लीक?

भाजप नेत्यांचा प्रताप; मोदी-शाहांच्या मेहनतीवर पाणी, प्रचारात वापरली काँग्रेस नेत्याच्या सुनेची डान्स क्लीप

West Bengal Election 2021 : पंतप्रधान मोदींकडून आचारसंहितेचा भंग, TMCची निवडणूक आयोगाकडे तक्रार

(women soldiers of central force will be posted under the protection of Suvendu Adhikari)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.