Bollywood Song Story: 4 गायक अन् 100 डान्सर, शूटिंगला लागले फक्त ५ मिनिटं.. आजही लग्नात ‘हे’ गाणं वाजलं की पाय थिरकतात
गाजलेले गाणे म्हणजे दिल धडकने दो चित्रपटातील गल्ला गूडिया. रणवीर सिंह, अनिल कपूर आणि फरहान अख्तरवर प्रदर्शित झालेले हे गाणे आजही लग्नांमध्ये हमखास वाजवले जाते. पण तुम्हाल माहिती आहे का? हे गाणे फक्त पाच मिनिटात शूट झाले होते. एवढेच नव्हेतर हे गाणे रेकॉर्ड करण्यावेळीही एक रंजक प्रसंग घडला होता.

Gallan Goodiyaan Song Story: हिंदी सिनेसृष्टीत चित्रपटांइतकीच त्यामधील गाणीही प्रेक्षकांना वेड लावतात. बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी आहेत जी चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतरही आजही प्रेक्षकांना वेड लावत असतात. ती गाणी कुठेही कानावर पडली तर पाय आपोआप थिरकायला लागतात. असंच एक गाजलेले गाणे म्हणजे दिल धडकने दो चित्रपटातील गल्ला गूडिया. रणवीर सिंह, अनिल कपूर आणि फरहान अख्तरवर प्रदर्शित झालेले हे गाणे आजही लग्नांमध्ये हमखास वाजवले जाते. पण तुम्हाल माहिती आहे का? हे गाणे फक्त पाच मिनिटात शूट झाले होते. एवढेच नव्हेतर हे गाणे रेकॉर्ड करण्यावेळीही एक रंजक प्रसंग घडला होता.
फक्त 5 मिनिटात संपलेलं गाण्याचं शुटिंग!
झोया अख्तर दिग्दर्शित ‘दिल धडकने दो’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणवीर सिंग, अनिल कपूर, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘गल्लां गुडियां’ हे गाणे त्याच्या मजेशीर आणि उत्साही संगीतामुळे खूप लोकप्रिय झाले. इतर सामान्य गाण्यांप्रमाणे या गाण्याच्या शुटिंगला अनेक दिवस लागले नाहीत.
हे गाणे फक्त पाच मिनिटांच्या एकाच टेकमध्ये चित्रित करण्यात आले. विशेष गोष्ट अशी होती की, यासाठी १०० हून अधिक बॅकडान्सर आणि चित्रपटाच्या निर्मिती टीमच्या सदस्यांना एकाच वेळी सांभाळावे लागले. इतक्या लोकांमध्ये कट न करता गाण्याचे चित्रीकरण करणे हे एक मोठे आव्हान होते.
फोनवर रेकॉर्ड केली आयडिया…!
या गाण्याबद्दल आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, संगीतकार एहसान नूरानी यांना ही कल्पना सुचली होती. त्यांना गाण्याची ही चाल विसरायची नव्हती, म्हणून त्यांनी ती लगेचच आपल्या फोनवर रेकॉर्ड केली. हे गाणे सुखविंदर सिंग, शंकर महादेवन, फरहान अख्तर, मनीष जे. टिपू आणि यशिता शर्मा यांनी गायले आहे. गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान एका स्त्री आवाजाची गरज होती. स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या यशिता शर्माच्या आईने हेलो, हेलो डोंट माइंड मेरा यह कहना…’ ही ओळ रेकॉर्ड केली.