AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनू मलिकचा खरा चेहरा समोर, अमाल म्हणाला, ‘काकाने वडिलांना फसवलं, आई प्रेग्नेंट होती तेव्हा…’

Bigg Boss 19: मलिक कुटुंबातील वाद चव्हाट्यावर, 'बिग बॉस 19' स्पर्धक अमालकडून कटू सत्य समोर, म्हणाला, 'काकाने वडिलांना फसवलं, आई प्रेग्नेंट होती तेव्हा...', 'बिग बॉस'च्या घरात अमाल मलिकने केला मोठा खुलासा...

अनू मलिकचा खरा चेहरा समोर, अमाल म्हणाला, 'काकाने वडिलांना फसवलं, आई प्रेग्नेंट होती तेव्हा...'
फाईल फोटो
| Updated on: Sep 19, 2025 | 9:19 AM
Share

Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19’ मध्ये स्पर्धक आता घरात त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील मोठे खुलासे करताना दिसत आहेत. आता स्पर्धक अमाल मलिक याने देखील खसगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे मलिक कुटुंबाचे वाद चव्हाट्यावर आलेत. ‘बिग बॉस’ मध्ये जवळचा मित्र बसीर अलीला अमालने आई – वडिलांसोबत झालेल्या अन्यायाबद्दल सांगितलं आहे. कुटुंबाने अमालच्या आईसोबत देखील वाईट वर्तन केलं होतं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमाल मलिक याने केलेल्या मोठ्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

वडिलांची काका अनू मलिकने केली फसवणूक…

अनू मलिकला काळ्या मनाचा म्हणत अमाल म्हणाला, ‘मी माझ्या वडिलांना अनेक वेळा असहाय्य परिस्थितीत पाहिलं आहे. माझ्या वडिलांना एक गाणं रेकॉर्ड करण्यासाठी स्टूडिओमध्ये बोलावलं होतं. बाबा त्यावेळी यारी रोड स्थित एका म्यूझिक शॉपमध्ये जात होते. माझ्या वडिलांनी जे गाणं रेकॉर्ड केलं होतं.  ते गाणं उदित नारायण यांच्या आवाजात वाजलं. जेव्हा माझ्या वडिलांनी दुकानदाराला विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं तीन वर्ष जुन्या सिनेमातील गाणं आहे… अनू मलिकने वडिलांकडून मॉक रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर गाणं उदित नारायण यांच्या आवाजात आलं. त्यावेळी अनूने पप्पांना असं दाखवलं की जणू तो त्यांना काम करण्याची संधी देत ​​आहे.’

प्रेग्नेंसीमध्ये आईने खूप काही सहन केलं…

अमाल म्हणाला, ‘जेव्हा आई गरोदर होती तेव्हा तिने अनेक समस्यांचा समाना केला. लोकं म्हणतात मी खूप शिव्या देतो. मी खूप मानसिक आघात सहन केला आहे. आई गरोदर असताना तेव्हा तिच्यावर खूप अत्याचार झाले. आम्ही त्यावेळी एकत्र कुटुंबात राहत होतो म्हणून तिच्याकडून घरातील खूप काम करून घ्यायचे. एके दिवशी आईने रागाने कपाटावर हात आपटला. आज आपण जिथे आहोत ते फक्त आणि फक्त आईमुळे आहोत. ‘

अमालवर भडकली गौहर

गौहर खानने नुकताच बिग बॉसबद्दल अमाल मलिकवर आपला राग व्यक्त केला. गौहरने अमालच्या गैरवर्तनावर आक्षेप घेतला आणि त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणी केली. एवढंच नाही तर, अभिषेक बजाजला बैलाच्या मेंदूचा मुलगा म्हणल्याबद्दलही त्यांनी खूप राग व्यक्त केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...