AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 12 लाखात तयार झालेला चित्रपट, ठरला प्रचंड ब्लॉकबस्टर, 32 वर्षानंतर आता पुन्हा होतोय रिलीज, पाहण्यासाठी व्हायची प्रचंड गर्दी

32 वर्षांपूर्वी फक्त 12 लाखांमध्ये तयार झालेला हा चित्रपट, प्रदर्शित होताच ठरला प्रचंड मोठा ब्लॉकबस्टर. आता 9 कोटी खर्च करून पुन्हा 21 ऑगस्टला होणार प्रदर्शित.

फक्त 12 लाखात तयार झालेला चित्रपट, ठरला प्रचंड ब्लॉकबस्टर, 32 वर्षानंतर आता पुन्हा होतोय रिलीज, पाहण्यासाठी व्हायची प्रचंड गर्दी
| Updated on: Aug 15, 2026 | 4:23 PM
Share

हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेला आणि आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेला ‘1942: ए लव्ह स्टोरी’ हा चित्रपट तब्बल 32 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार आहे. अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, मनीषा कोईराला, डॅनी डेन्झोंगपा आणि प्राण यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट आता 8K रिझोल्यूशन आणि 5.1 डॉल्बी साउंडमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या 21 ऑगस्टला हा नवा अवतार प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या नव्या व्हर्जनसाठी तब्बल 9 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते विदु विनोद चोप्रा यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाच्या निर्मितीमागचे अनेक रंजक किस्से सांगितले. विशेष म्हणजे, चित्रपट तयार होत असताना त्यांच्याकडे पैशांची मोठी कमतरता होती. सेटची उभारणी करताना अनेक गोष्टी बजेटअभावी कमी कराव्या लागत होत्या.

सेट डिझायनर नितिन चंद्रकांत देसाई यांच्यासोबत सेटच्या मॉडेलवर चर्चा सुरू असताना जॅकी श्रॉफ यांनी हस्तक्षेप केला. चित्रपटातील आपल्या शॉटसाठी काही ठराविक गल्ल्या आणि घरं आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पैसे कमी पडत असतील तर त्यासाठी आपण पैसे देऊ, असे जॅकी श्रॉफ यांनी सांगितले. त्यानंतर अनिल कपूर यांनीही चित्रपटासाठी आर्थिक मदत केली. कलाकारांच्या या सहकार्यामुळे चित्रपटाचे काम पुढे सुरू राहिले.

क्लायमॅक्ससाठी मिळाला होता फक्त एक दिवस

चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूटिंगही मोठे आव्हान होते. या सीनसाठी मोठ्या संख्येने कलाकारांची गरज होती. मात्र, संपूर्ण क्लायमॅक्स शूट करण्यासाठी चोप्रांकडे फक्त एकच दिवस होता. शूटिंग दुसऱ्या दिवसापर्यंत गेले असते तर पुन्हा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत क्लायमॅक्स एका दिवसात पूर्ण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात पूर्णही केला.

प्रीमियरच्या वेळी स्वतः बंद केले होते सिनेमागृहाचे दरवाजे

चित्रपटाच्या प्रीमियरचा किस्साही तितकाच भन्नाट आहे. चित्रपट सुरू होण्याच्या वेळी अनेक मान्यवर मोठ्या गाड्यांमधून येत होते. मात्र, काही जण उशिरा पोहोचल्याने त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही. विदु विनोद चोप्रा यांनी स्वतः सिनेमागृहाचे दरवाजे बंद करून घेतले होते.

त्यांच्या मते, वेळेवर न येणाऱ्या व्यक्तीला चित्रपट आणि वेळेचा आदर नाही. त्यामुळे कोण कितीही मोठी व्यक्ती असली तरी वेळ संपल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही अशी त्यांची भूमिका होती.

Follow Us
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?