AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 तास 18 मिनिटांचा स्पाय थ्रिलर, पाकिस्तानविरोधातील मिशनची कथा, तिथेच 3 आठवड्यांपासून होतोय ट्रेंड

भारत ते पाकिस्तानपर्यंत 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाची क्रेझ लोकांमध्ये पहायला मिळतेय. यादरम्यान असाच एक स्पाय थ्रिलर चित्रपट पाकिस्तानमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर टॉप 10 मध्ये ट्रेंड होताना दिसतंय.

2 तास 18 मिनिटांचा स्पाय थ्रिलर, पाकिस्तानविरोधातील मिशनची कथा, तिथेच 3 आठवड्यांपासून होतोय ट्रेंड
चित्रपटातील दृश्यImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 26, 2026 | 2:56 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा स्पाय थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. फक्त भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाचा बोलबाला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही पाकिस्तानकडून विरोध झाला होता. तरीसुद्धा तिथेच त्याचे सर्वाधिक पायरेटेड डाऊनलोड्स आढळून आले होते. ओटीटीवरही ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळतोय. रंजक बाब म्हणजे, धुरंधरशिवाय आणखी एक असा स्पाय थ्रिलर चित्रपट आहे, जो पाकिस्तानात भरपूर पाहिला जातोय. या चित्रपटात एका रॉ एजंटची कथा दाखवण्यात आली आहे, जी गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाते. 2018 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव ‘राझी’ असं आहे. आलिया भट्टचा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय.

पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवर ‘राझी’ हा चित्रपट टॉप 10 मध्ये ट्रेंड होऊ लागला आहे. आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवर ट्रेंड होणाऱ्या टॉप 10 या यादीत हा चित्रपट नवव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये हा चित्रपट फक्त एक किंवा दोन दिवसांपासून नाही तर गेल्या तीन आठवड्यांपासून नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत आहे.

मेघना गुलजारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि त्याचा बजेट जवळपास 35 ते 40 कोटी रुपयांमध्ये होता. जगभरात या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. ‘राझी’ने जगभरात 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. 2018 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी आठ वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. या चित्रपटाची कथा हरिंदर सिक्का यांच्या ‘सहमत’ या कादंबरीवर आधारित होती. यामध्ये एका काश्मिरी तरुणीची कथा दाखवण्यात आली आहे, जी वडिलांच्या म्हणण्यानुसार गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाते. ती एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारताला गुप्त माहिती पुरवण्यात मदत करते. या चित्रपटाने फिल्मफेअरपासून आयफापर्यंत सुमारे 27 पुरस्कार जिंकले होते. या चित्रपटातील आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या दमदार अभिनयकौशल्याची खूप प्रशंसा झाली होती.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ