आई झाल्यानंतर आलिया भट्टची पहिली पोस्ट; सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

'आमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट..'; आलिया भट्टच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

आई झाल्यानंतर आलिया भट्टची पहिली पोस्ट; सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव
Alia and RanbirImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 06, 2022 | 2:00 PM

मुंबई- अभिनेत्री आलिया भट्टने रविवारी (6 नोव्हेंबर) मुलीला जन्म दिला. कपूर कुटुंबात सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. रविवारी सकाळीच आलियाला मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी रणबीरसुद्धा तिच्यासोबत होता. त्यानंतर आलियाची आई सोनी राजदान आणि रणबीरची आई नीतू कपूर हे रुग्णालयात दाखल झाले. मुलीचा जन्म झाल्यानंतर आलियाने सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने आई झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

‘आमच्या आयुष्यातील ही सर्वोत्कृष्ट बातमी आहे. आमचं बाळ या जगात आलं आहे आणि अत्यंत जादुई भासणारी ती कन्या आहे. आमच्यावर जणू प्रेमाचा वर्षाव झाला आहे. रणबीर आणि मी आता अधिकृतरित्या पालक झाले आहोत’, अशी पोस्ट आलियाने लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

आलियाच्या या पोस्टवर सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या राजकुमारीला पाहण्याची वाट पाहत आहोत’, अशी कमेंट सोनम कपूरने केली. तर ‘तुम्हा दोघांना शुभेच्छा. सदैव आनंदी आणि स्वस्थ राहा’, अशा शब्दांत श्वेता बच्चनने शुभेच्छा दिल्या आहेत.

झोया अख्तर, सोफी चौधरी, नेहा धुपिया, रोहन श्रेष्ठा, कपिल शर्मा, रिया कपूर, इशान खट्टर, मौनी रॉय, सानिया मिर्झा यांसारख्या सेलिब्रिटींनीही आलियाच्या या पोस्टवर कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

27 जून रोजी आलियाने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. इन्स्टाग्रामवर अल्ट्रासाऊंडचा फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. आलिया आण रणबीरने मुंबईत एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली. घरच्या घरीच मोजक्या कुटुंबीयांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.