AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 चा सर्वात मोठा हॉरर-कॉमेडी चित्रपट, OTT वर येताच बनला नंबर-1, बघताना देखील प्रेक्षक घाबरायचे

2025 चा सर्वात मोठा हॉरर-कॉमेडी चित्रपट, जो OTT वर येताच बनला नंबर-1, थिएटरमध्ये बघताना प्रेक्षकांना यायचा घाम.

2025 चा सर्वात मोठा हॉरर-कॉमेडी चित्रपट, OTT वर येताच बनला नंबर-1, बघताना देखील प्रेक्षक घाबरायचे
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 05, 2026 | 9:50 AM
Share

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होत असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीतही सतत बदल होताना दिसतो आहे. कधी थ्रिलर, कधी रोमँटिक ड्रामा तर कधी सत्य घटनांवर आधारित कथा प्रेक्षकांना अधिक भावतात.

अशातच आता या स्पर्धेत अलीकडेच एका चित्रपटाने प्रेक्षकांचं प्रचंड लक्ष वेधून घेतलं आहे. हा चित्रपट म्हणजे ‘ॲनाकोंडा’, जो ओटीटीवर रिलीज होताच थेट नंबर-1 ट्रेंडिंगवर पोहोचला आहे. काही तासांतच या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून सोशल मीडियावर त्याचे क्लिप्स आणि रिव्ह्यू मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटाच्या कथा, दिग्दर्शन आणि अभिनयाचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

भयानक वास्तवाचा सामना

हा चित्रपट 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. कथानक चार मित्रांभोवती फिरतं, जे त्यांच्या रोजच्या कंटाळवाण्या आयुष्याला कंटाळलेले असतात. काहीतरी वेगळं आणि थरारक करण्यासाठी ते त्यांच्या जुन्या आवडत्या हॉरर चित्रपटाची आठवण काढतात आणि त्याचं पुन्हा शूटिंग करण्याचा प्लॅन आखतात. या कल्पनेनुसार ते ब्राझीलमधील दाट आणि धोकादायक जंगलात पोहोचतात, जिथे त्यांना ‘ॲनाकोंडा’सारख्या भयानक वास्तवाचा सामना करावा लागतो.

जंगलात जसजसे ते पुढे जातात, तसतसा चित्रपटात सस्पेन्स आणि थ्रिल वाढत जातो. सुरुवातीला ही एक मजेदार ट्रिप असल्यासारखे वाटते, पण हळूहळू त्यांना कळतं की काहीतरी अदृश्य धोका त्यांच्या मागे लागला आहे. दाट जंगल, अंधार आणि विचित्र आवाज यामुळे भीतीचं वातावरण अधिक जास्त होतं.

418 कोटी बजेट अन् कमाई 1248 कोटी रुपये

चित्रपटाचा सर्वात रोमांचक भाग तेव्हा येतो, जेव्हा हे मित्र प्रत्यक्ष एका विशाल ॲनाकोंडासमोर येतात. त्या वेळी त्यांची बनावट साधनं आणि योजना पूर्णपणे फेल होतात. अशा गंभीर परिस्थितीतही जैक ब्लैक आणि पॉल रुड आपल्या कॉमिक अभिनयाने प्रेक्षकांना हसवतात. त्यामुळे चित्रपटात भीतीसोबत मनोरंजनही बघायला मिळते.

ॲनाकोंडा हा चित्रपट मोठा हिट ठरला. सुमारे 418 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास 1248 कोटींची कमाई केली. जरी चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी ओटीटीवर त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. थरार, विनोद आणि साहस यांचा उत्तम संगम असलेला हा चित्रपट सध्या ओटीटीवर प्रेक्षकांसाठी एक परफेक्ट मनोरंजन पॅकेज ठरत आहे.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय