AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववधूच्या मनातील भावना व्यक्त करणारं गाणं, 28 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट

नववधूच्या मनातील भावना व्यक्त करणारं 28 वर्षांपू्वींचं प्रचंड सुंदर गाणं. लता मंगेशकर, गुलजार आणि रहमान यांनी अजरामर केलं. तुम्ही ऐकलं का?

नववधूच्या मनातील भावना व्यक्त करणारं गाणं, 28 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
| Updated on: Sep 13, 2026 | 2:37 PM
Share

90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांना आजही एक वेगळीच जादू आहे. त्या काळातील अनेक गाणी आजच्या पिढीच्या प्लेलिस्टमध्येही आवर्जून ऐकली जातात. प्रेम, लग्न आणि नव्या नात्याच्या हळुवार भावना अतिशय सुंदर पद्धतीने मांडणारं असंच एक आयकॉनिक गाणं म्हणजे ‘जिया जले’.

1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल से..’ या चित्रपटातील हे गाणं दिग्दर्शक मणिरत्नम यांनी अतिशय कलात्मक पद्धतीने पडद्यावर साकारलं. या गाण्यात शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते. लग्नानंतरच्या प्रेमाच्या नाजूक भावना आणि दोन मनांमधील जवळीक या गाण्यातून प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे.

भावना व्यक्त करणारं गाणं

‘जिया जले’ हे गाणं केवळ एक रोमँटिक ट्रॅक म्हणून ओळखलं जात नाही तर नवविवाहित जोडप्याच्या मनातील प्रेम, संकोच आणि हळुवार भावना व्यक्त करणारं गाणं म्हणूनही ते चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे. गाण्यात कोणतेही थेट शब्द न वापरता प्रेमाच्या भावनांना प्रतीकात्मक आणि काव्यात्मक पद्धतीने मांडण्यात आलं आहे.

या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले असून त्यांच्या खास शैलीची झलक यात पाहायला मिळते. तर ए. आर. रहमान यांच्या संगीताने गाण्याला एक वेगळीच जादुई अनुभूती दिली आहे. गुलजार यांच्या काव्यात्मक शब्दांना रहमान यांच्या संगीताची साथ मिळाल्याने ‘जिया जले’ हे गाणं आजही तितकंच प्रेक्षकांना ऐकावसं वाटतं.

या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील मल्याळम भाषेतील कोरस. गाण्याच्या संगीतामध्ये मिसळलेला हा कोरस ट्रॅकला वेगळा रंग देतो आणि त्याची जादू आणखी वाढवतो. लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजामुळे गाण्याला भावनिक खोली मिळाली आहे.

3 दशकांनंतर गाणं सुपरहिट

विशेष म्हणजे, ‘दिल से..’ हा प्रिती झिंटाचा बॉलिवूडमधील पदार्पणाचा चित्रपट होता. या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांची पडद्यावरील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना विशेष भावली.

तीन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ‘जिया जले’ची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही हे गाणं मोठ्या प्रमाणावर ऐकलं जातं आणि जुन्या आठवणींना उजाळा देतं.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद