चित्रपटसृष्टीत शोककळा, 3 इडियट्समधील अभिनेत्याचे निधन, ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला शेवटचा श्वास

एक अतिशय दु:ख अशी घटना घडली आहे. अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले. त्यांनी ठाण्यातील रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय.

चित्रपटसृष्टीत शोककळा, 3 इडियट्समधील अभिनेत्याचे निधन, ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला शेवटचा श्वास
Achyut Potdar
| Updated on: Aug 19, 2025 | 7:28 AM

एक दुःखद बातमी येत आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका करणारे अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या 91 व्या वर्षी दु:ख निधन झाले. सोमवारी मुंबईतील ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दल काही माहित ही मिळू शकली नाहीये. अच्युत पोतदार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आमिर खानच्या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार, मागील काही दिवसांपासून अच्युत पोतदार हे आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होते आणि रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

धमाकेदार भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा अलविदा

ज्युपिटर हॉस्पिटल उपचार सुरू असतानाच त्यांचा जीव गेला. त्यांच्यावर अंतिम संस्कार 19 ऑगस्ट 2025  रोजी ठाण्यात केले जातील. हेच नाही तर अभिनय क्षेत्रात येण्याच्या अगोदर त्यांनी भारतीय सैन्यामध्ये काम केले. 80 च्या दशकात त्यांनी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आणि अभिनय क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव ते बनले.

ठाण्यातील हॉस्पिटल काही दिवसांपासून सुरू होते उपचार 

अच्युत पोतदार हे आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसले आहेत. फक्त आमिर खानच नाही तर त्यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.चित्रपटांव्यतिरिक्त अच्युत पोतदार यांनी ‘वागले की दुनिया’, ‘माझा होशील ना’ या यांसारख्या टीव्ही शोमध्येही काम केले. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर अनेक यूजर्स त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

अभिनेत्याच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा

अच्युत पोतदार या जगात नसल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसतोय. कुटुंबावर सध्या शोककळा पसरली आहे. अच्युत पोतदार यांनी  ‘आक्रोश’, ‘व्हाय अल्बर्ट पिंटो को गुस्सा आता है’, ‘अर्ध सत्य’, ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘दिलवाले’, ‘ये दिलगी’, ‘रंगीला’, यांसारख्या अनेक भूमिका त्यांनी साकारल्या. एक मोठा कलाकार आपल्यातून निघून गेला आहे.