AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

32 वर्षांपूर्वीचा सुपरहिट चित्रपट, ज्यामधील प्रत्येक गाणं ठरलं हिट, ऐकताच डोळ्यात येते पाणी, आजही लोक..

32 वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट, ज्यामधील 7 गाणी ठरली होती प्रचंड हिट, जी ऐकताच लोकांच्या डोळ्यांमध्ये यायचे पाणी. आजही Youtube वर लोक सर्च करून ऐकतात.

32 वर्षांपूर्वीचा सुपरहिट चित्रपट, ज्यामधील प्रत्येक गाणं ठरलं हिट, ऐकताच डोळ्यात येते पाणी, आजही लोक..
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 03, 2026 | 5:57 PM
Share

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगनचा फिल्मी प्रवास आज यशस्वी मानला जातो. गेल्या तीन दशकांपासून तो बॉक्स ऑफिसवर आपली छाप कायम ठेवताना दिसतो आहे. त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक त्याचे चाहते झाले आहेत. मात्र, त्याच्या करिअरमध्ये एक असा काळही आला होता, जेव्हा त्याचे सलग चित्रपट फ्लॉप ठरत होते.

1991 साली अजय देवगनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली पण त्यानंतर काही काळ त्याच्या वाट्याला अपयशच आले. 1993 च्या सुमारास त्याचे अनेक चित्रपट अपयशी ठरले. अशा परिस्थितीत 1994 मध्ये त्याच्या हातात एक असा चित्रपट आला, ज्याने त्याच्या करिअरला नवसंजीवनी दिली.

11 कोटी रुपयांहून अधिक कमाई

हा चित्रपट म्हणजे ‘दिलवाले’. या अॅक्शन-ड्रामा चित्रपटात अजय देवगन सोबत रवीना टंडन आणि सुनिल शेट्टी प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात अजय देवगनने ‘अरुण’ हे पात्र साकारले, तर रवीना टंडनने ‘सपना’ची भूमिका केली. सुनील शेट्टीने पोलिस इन्स्पेक्टर विक्रमची भूमिका साकारली होती. अॅक्शन आणि रोमांसचा उत्तम मिलाफ असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

सुमारे 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 11 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आणि सुपरहिट ठरला. विशेष म्हणजे, या चित्रपटापूर्वी अजय देवगनचे सलग आठ चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे ‘दिलवाले’च्या यशाने त्याच्या करिअरला मोठा आधार मिळाला आणि तो पुन्हा सुपरस्टार म्हणून उभा राहिला.

चित्रपटातील 7 गाणी ठरली सुपरहिट

या चित्रपटाची आणखी एक मोठी ताकद म्हणजे त्यातील गाणी. चित्रपटात एकूण सात गाणी होती, ज्यापैकी ‘कितना हसीन चेहरा’, ‘सातों जन्म में तेरे’ आणि Jeeta Tha Jiske Liye ही गाणी विशेष गाजली. या गाण्यांना नदीम-श्रवण यांनी संगीत दिले होते, जे त्या काळात अत्यंत लोकप्रिय होते.

‘जीता था जिसके लिए’ हे गाणं 90 च्या दशकातील सर्वात आयकॉनिक सॅड गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याच्या भावपूर्ण शब्दांमुळे आणि हळव्या धुनेमुळे ते आजही श्रोत्यांच्या मनाला भिडतं. आजही हे गाणं विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणावर ऐकलं जातं. हा चित्रपट केवळ एक सुपरहिट चित्रपट नव्हता तर अजय देवगनच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटाने त्याला पुन्हा यशाच्या शिखरावर नेलं आणि बॉलिवूडमध्ये त्याची मजबूत ओळख निर्माण झाली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...