AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नात DJ वाजताच सगळ्यांना ठेका धरायला लावणारं गाणं; भाऊजी आणि मेहुणीवर आधारित, 35 वर्षांपासून सुपरहिट

भाऊजी आणि मेहुणीवर आधारित 35 वर्षांपूर्वींचं गाणं, जे आजही प्रत्येक लग्नात वाजतच. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे ठरलं इतकं सुपरहिट की आजही Gen-Z च्या आई-वडिलांचं आवडतं.

लग्नात DJ वाजताच सगळ्यांना ठेका धरायला लावणारं गाणं; भाऊजी आणि मेहुणीवर आधारित, 35 वर्षांपासून सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 11, 2026 | 1:05 PM
Share

भाऊजी-मेहुणीचं नातं हे नेहमीच खास आणि मजेशीर मानलं जातं. हिंदी चित्रपटसृष्टीतही या नात्यावर अनेक गाणी आणि प्रसंग पाहायला मिळाले आहेत. 35 वर्षांपूर्वी आलेलं असंच एक गाणं आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. ‘वो मेरे जीजा जी’ हे गाणं 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सनम बेवफा’ या चित्रपटातील असून, आजही लग्नसमारंभात आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवडीने ऐकलं जातं.

‘वो मेरे जीजा जी’ हे गाणं लता मंगेशकर यांनी आपल्या मधुर आवाजात गायलं आहे. हे गाणं ‘जिनके आगे जी, जिनके पीछे जी’ या नावानेही ओळखलं जातं. गाण्याला महेश-किशोर यांनी संगीत दिलं असून, प्रसिद्ध गीतकार सावन कुमार टाक यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. गाण्यात साली आपल्या भाऊजीला बहिणीची काळजी घेण्याचा प्रेमळ आणि मजेशीर सल्ला देते.

‘काली अनार की है मेरी ये बहना… देखो कभी तुम ना इसको सताना’ अशा गोड शब्दांमधून भाऊजी-मेहुणीच्या नात्यातील गंमत आणि आपुलकी पाहायला मिळते. लता मंगेशकरांच्या आवाजामुळे या गाण्याला वेगळीच लोकप्रियता मिळाली.

सलमान खान-चांदनीची जोडी ठरली लक्षवेधी

‘सनम बेवफा’ या चित्रपटात सलमान खान, चांदनी, प्राण, डॅनी डेंजोंगपा आणि कंचन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील भाऊजी-मेहुणीच्या प्रसंगात हे गाणं सादर करण्यात आलं असून, त्यातील मजेशीर अंदाजामुळे आजही हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.

1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सनम बेवफा’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. विशेषतः दिल्ली-उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाब यांसारख्या भागांमध्ये चित्रपटाने दमदार कामगिरी केली. चित्रपटातील अभिनयासाठी डॅनी डेंजोंगपा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

आजही आठवणींना उजाळा

90च्या दशकातील गाणी आजही रसिकांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहेत. ‘वो मेरे जीजा जी’ हे त्यापैकीच एक गाणं आहे. भाऊजी-मेहुणीच्या नात्यातील गंमत, कौटुंबिक वातावरण आणि लता मंगेशकरांचा आवाज यामुळे या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. लग्नसमारंभात हे गाणं वाजलं की 90च्या दशकातील जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.

Follow Us
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज, पुतिन जिनपिंग मोदींच्या भेटीकडे लक्ष
BRICS परिषदेसाठी दिल्लीत मोठ्या हालचाली, पुतिन जिनपिंग आणि PM मोदींच्या भेटीकडे लक्ष
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता...
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुक..
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर