AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 बायकांचा नवरा, 12 महिलांसोबत अफेअर… अंत मात्र धक्कादायक, खोलीत 2 दिवस सडत होता अभिनेत्याचा मृतदेह

खलनयाक म्हणून ज्याने बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली, त्याच अभिनेत्याला त्याच्या जवळच्या लोकांनी फसवलं.. अभिनेत्याने एक दोन नाही तर, 5 लग्न केली आणि 12 महिलांसोबत त्याचे प्रेमसंबंध होते... पण अभिनेत्याचा अंत फार भयानक होता...

5 बायकांचा नवरा, 12 महिलांसोबत अफेअर... अंत मात्र धक्कादायक, खोलीत 2 दिवस सडत होता अभिनेत्याचा मृतदेह
| Updated on: Apr 06, 2026 | 3:43 PM
Share

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे त्यांच्या नकारात्मक आणि खलनायकाच्या भूमिकेमुळे चर्चेत राहिले. त्यांनी मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन तर केलं. पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, त्याने अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका बजावली आहे. अभिनेत्याने एक दोन नाही तर, 5 लग्न केली आणि 12 महिलांसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. पण शेवटच्या क्षणी त्याच्यासोबत कोणीच नव्हतं…

पाच लग्न आणि एक मुलगा…

सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा सुरु आहे, त्या अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता महेश आनंद आहे… शेवटच्या क्षणात अभिनेता पूर्णपणे एकटा पडला आणि कुटुंबियांनी देखील त्याची साथ सोडली. अभिनेत्याची खासगी आयुष्याची चर्चा त्याच्या निधनानंतर रंगली. असं सांगितलं जातं की, अभिनेत्याने 12 महिलांना डेट केलं आणि पाच लग्न केली.

महेश याने पहिलं लग्न रिना रॉय हिच्यासोबत केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दुसरं लग्न बरखा रॉय हिच्यासोबत केलं. त्यानंतर अभिनेत्याने मिस इंडिया इंटरनॅशनल एरिका मारिया डिसोझा हिच्याशी लग्न केले, दोघंना एक मुलगा देखील आहे. अभिनेत्याने चौथं लग्न अभिनेत्री उषा बचानी हिच्याशी केलं, पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही. महेशने पाचव्यांदा रशियन महिला लाना हिच्याशी लग्न करून प्रेमाला आणखी एक संधी दिली. पण कोणतंच नातं अधिक काळ टिकलं नाही.

अखेर कुटुंबियांनीच अभिनेत्याला पूर्णपणे फसवलं. एक दिवस असा आला जेव्हा, अभिनेत्याकडे पाण्याची बाटली घेण्यासाठी देखील पैसे नव्हते. एक दिवस सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याने स्वतःच्या परिस्थितीबद्दल सांगितलं होतं…

अभिनेत्याचं निधन

9 फेब्रुवारी 2019 रोजी, महेश आनंद वर्सोवा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. 57 वर्षीय अभिनेता त्यच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. दोन दिवसांपासून अभिनेत्याने घराचा दरवाजा देखील उघडला नव्हता. अखेर घरातील मोलकरणीने अभिनेत्याच्या बहिणीला फोन केलं आणि सांगितलं. तेव्हा अभिनेत्याच्या बहिणीने पोलिसांना कळवलं.

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला आणि पाहिलं तर, अभिनेता सोफ्यावर पडलेला आणि त्याच्याजवळ दारुच्या बाटल्या आणि खाण्याचे पदार्थ पडलेले होते. अभिनेत्याचं निधन झालेलं आणि दोन दिवस मृतदेह घरातच सडत होता… पण पोस्टमार्टन रिपोर्टनुसार, अभिनेत्याचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झालेला. रिपोर्टमध्ये, अभिनेत्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...