AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 च्या दशकातील या अभिनेत्याला मुख्यमंत्र्यांना करायचे होते डेट, 51 व्या वर्षीही आहे सिंगल

90 च्या दशकातील या अभिनेत्याने मुख्यमंत्र्यांना डेट करण्याची व्यक्त केली होती इच्छा. आजही 51 वर्षानंतर आहे सिंगल. काही वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिलेल्या या अभिनेत्याने केला जबरदस्त कमबॅक.

90 च्या दशकातील या अभिनेत्याला मुख्यमंत्र्यांना करायचे होते डेट, 51 व्या वर्षीही आहे सिंगल
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 29, 2026 | 9:07 AM
Share

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपटात त्याने साकारलेला ‘रहमान डकैत’ हा कराचीतील भयानक डॉन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. या भूमिकेने प्रेक्षकांचे अक्षरशः रोंगटे उभे केले असून, त्याचा स्वॅग आणि डान्स स्टाइल तर नव्या पिढीसाठी एक ट्रेंडच ठरला आहे.

विशेष म्हणजे, ही भूमिका सुरुवातीला बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी नाकारली होती. मात्र अक्षय खन्नाने हे आव्हान स्वीकारत आपल्या अभिनयाच्या जोरावर या पात्राला वेगळ्याच उंचीवर नेले.

2025 मध्ये ‘छावा’ या चित्रपटातील त्याने साकारलेला औरंगजेबचा रोलही समीक्षकांनी डोक्यावर घेतला होता. 51 वर्षांच्या या अभिनेत्याचा प्रवास मात्र खूप सोपा नव्हता. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असलेल्या अक्षयने 1997 मध्ये ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट अपयशी ठरला, पण त्यानंतर जेपी दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘धर्मवीर भाकरी’ या त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार

त्याच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट 2001 साली फरहान अख्तर यांच्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटामुळे आला. या चित्रपटात ‘सिद्धार्थ’ या शांत, संवेदनशील प्रेमिकाची भूमिका साकारत त्याने पारंपरिक अॅक्शन हिरोच्या चौकटीबाहेर जाऊन अभिनयाचा नवा पैलू दाखवला. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला.

यानंतर ‘हमराज’, ‘हंगामा’, ‘रेस’ यांसारख्या चित्रपटांत त्याने खलनायक आणि कॉमिक भूमिकांमधूनही आपली ताकद दाखवली. ‘गांधी, माय फादर’ मधील त्याच्या गंभीर अभिनयालाही मोठी दाद मिळाली. मात्र, 2012 ते 2016 या काळात तो अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर राहिला.

जे.जयललिता यांना डेट करण्याची इच्छा

यानंतर ‘इत्तेफाक’, ‘मॉम’ आणि ‘दृश्यम 2’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने दमदार पुनरागमन केले. त्याची ‘दृश्यम 2’ मधील पोलिस अधिकाऱ्याची भूमिका खूप गाजली.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, 28 मार्च 1975 रोजी मुंबईत जन्मलेला अक्षय खन्ना आजही अविवाहित आहे. एका मुलाखतीत त्याने दिवंगत नेत्या जे. जयललिता यांना डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुन परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
एकनाथ शिंदे आज चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची करणार पाहणी
एकनाथ शिंदे आज चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी करणार; प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाचा वापर
घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच... खवड्या डोंगरावरील प्रकरण दिसतंय इतकं सरळ
घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच... खवड्या डोंगरावरील प्रकरण दिसतंय इतकं सरळ नाही, कुणालच्या आत्यानं जे सांगितलं ते...
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील दुर्घटना प्रकरण वेगळ्याच वळणावर?
सीसीटीव्हीत... रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय...
सीसीटीव्हीत... रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय लेकीचा मृत्यू नेमका कशामुळे?
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं...
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं टायअप, यंदाचा गणेशोत्सव...