AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

54 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, चित्रपट तयार होण्यासाठी लागली 14 वर्षे, लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे गाणं ठरलं सुपरहिट

54 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, चित्रपट तयार होण्यासाठी लागली होती 14 वर्षे, मोहम्मद रफी यांनी फक्त गायलेली गाण्याची एक लाईन. नंतर लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे ठरलं सुपरहिट.

54 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, चित्रपट तयार होण्यासाठी लागली 14 वर्षे, लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे गाणं ठरलं सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 20, 2026 | 4:44 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ गाजवणारे ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या आवाजाची जादू आजही संगीतप्रेमींच्या मनावर कायम आहे. आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली. विशेष म्हणजे, 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पाकिजा’ चित्रपटातील एका लोकप्रिय रोमँटिक गाण्यात रफी यांनी वारंवार केवळ एकच ओळ गायली होती, तर गाण्याच्या उर्वरित ओळी लता मंगेशकर यांनी आपल्या मधुर आवाजात सादर केल्या होत्या. या गाण्याचे नाव आहे ‘चलो दिलदार चलो’.

‘चलो दिलदार चलो’ हे गाणे आजही जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. या गाण्याचे बोल कैफ भोपाली यांनी लिहिले होते तर संगीतकार गुलाम मोहम्मद यांनी त्याला सुरेल संगीत दिले होते. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर या दोन दिग्गज गायकांच्या आवाजातील जुगलबंदी हे या गाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले.

‘चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो, हम हैं तैयार चलो’ ही ओळ रफी यांच्या आवाजात ऐकायला मिळते. तर गाण्यातील इतर कडवी लता मंगेशकर यांनी गायली आहेत. प्रेमी युगुलाने जगापासून दूर, चंद्रापलीकडील एका सुंदर दुनियेत जाण्याची कल्पना या गाण्यातून व्यक्त केली आहे. त्यातील रोमँटिक शब्द आणि संगीतामुळे हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

‘पाकिजा’ चित्रपटाचा 14 वर्षांचा प्रवास

‘चलो दिलदार चलो’ हे गाणे ‘पाकिजा’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात मीना कुमारी, राज कुमार, अशोक कुमार आणि नादिरा यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपट पूर्ण होण्यासाठी जवळपास 14 वर्षे लागली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कथा, अभिनय आणि संगीताच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले.

चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यातील ‘चलो दिलदार चलो’ या गाण्यात मीना कुमारी आणि राज कुमार यांच्या प्रेमकथेचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो. गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मीना कुमारी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे काही सीनसाठी त्यांच्या जागी बॉडी डबल म्हणून पद्मा खन्ना यांनी काम केल्याचेही सांगितले जाते.

पाच दशकांनंतरही गाण्याची लोकप्रियता कायम

1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पाकिजा’ चित्रपटातील या गाण्याला आता पाच दशकांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. जुन्या हिंदी चित्रपटसंगीताची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘चलो दिलदार चलो’ हे आजही खास गाणे आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!