AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1680 किमीचा प्रवास करून शूट झालं होतं हे गाणं, 62 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट, पुन्हा-पुन्हा ऐकतात लोक

1680 किलो मीटर लांब प्रवास करून शूट करण्यात आलं होतं 62 वर्षांपूर्वीचं हे सर्वात सुपरहिट गाणं. सीन पाहून आजही अनेक जण हे गाणं पुन्हा-पुन्हा ऐकतात.

1680 किमीचा प्रवास करून शूट झालं होतं हे गाणं, 62 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट, पुन्हा-पुन्हा ऐकतात लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 03, 2026 | 8:00 PM
Share

एक काळ असा होता, जेव्हा हिंदी चित्रपटांमध्ये काश्मीरची निसर्गरम्य सौंदर्य केवळ पार्श्वभूमी नव्हते तर ते कथेतल्या एका महत्त्वाच्या पात्राप्रमाणेच दिसायचे. डोंगर, तलाव, शिकारे आणि हिरवाईने नटलेली काश्मीरची वादी रुपेरी पडद्यावर दिसली की प्रेक्षकही त्या सौंदर्याचा भाग झाल्यासारखे वाटायचे. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कश्मीर की कली’ या चित्रपटानेही काश्मीरचे हे सौंदर्य अतिशय सुंदर पद्धतीने पडद्यावर मांडले.

या चित्रपटातील ‘तारीफ करूं क्या उसकी’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते. गाणे सुरू होताच डोळ्यांसमोर डल लेक, शिकारे आणि काश्मीरची निसर्गरम्य दृश्ये उभी राहतात. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील या गाण्याला ओ.पी. नय्यर यांनी संगीत दिले असून एस.एच. बिहारी यांनी गीत लिहिले आहे.

डल लेकवर चित्रीकरणाने गाण्याला मिळाली खास ओळख

‘तारीफ करूं क्या उसकी’ या गाण्याचे चित्रीकरण श्रीनगरमधील प्रसिद्ध डल लेकवर करण्यात आले होते. गाण्यात शम्मी कपूर शिकाऱ्यावर दिसतात तर शर्मिला टागोर दुसऱ्या शिकाऱ्यातून नजर येतात. दोघांमधील हे अंतर, शम्मी कपूर यांचा खट्याळ अंदाज आणि शर्मिला टागोर यांचे सौंदर्य यामुळे गाण्याला एक वेगळीच रोमँटिक रंगत मिळाली.

‘ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा’ या ओळींमधून शर्मिला टागोर यांच्या सौंदर्याचे वर्णन करण्यात आले आहे. मात्र या गाण्याची खासियत केवळ त्याचे शब्द किंवा संगीत नाही तर काश्मीरच्या निसर्गाशी केलेले अप्रतिम चित्रीकरण आहे.

शम्मी कपूर आणि शर्मिला टागोरची जोडी ठरली यादगार

‘कश्मीर की कली’मध्ये शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांची जोडी पाहायला मिळाली होती. या गाण्याच्या शूटिंगसाठी चित्रपटाची संपूर्ण टीम मुंबईहून काश्मीरला गेली होती. मुंबई ते श्रीनगर हे अंतर रस्त्याने साधारण 2,050 ते 2,290 किलोमीटर, तर हवाई अंतर सुमारे 1,650 ते 1,680 किलोमीटर आहे.

आज अनेक दशके उलटून गेली असली तरी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ‘तारीफ करूं क्या उसकी’ ऐकताना त्याच काळातील काश्मीर, डल लेक आणि शिकाऱ्यांचे सुंदर दृश्य डोळ्यांसमोर उभे राहते. त्यामुळे हे गाणे केवळ एक जुने रोमँटिक गीत न राहता हिंदी सिनेमातील काश्मीरच्या सौंदर्याची अजरामर आठवण बनले आहे.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...