महादेवाचं गाणं गाऊन त्याने रचला विक्रम… पण अभिनेत्याचा मनाला चटका लावणारा अंत

महाशिवरात्रीनिमित्त, एकच भक्तिगीत सर्वत्र घुमत आहे. हे गाणं केवळ मंदिरांमध्येच नाही तर सोशल मीडियावरही वाजवलं जातं. अनेकांच्या स्टेटसला आज गाणं असेल... पण गाण्यात दिसणार अभिनेता आपल्यात नाही... त्याचा अंत मनाला चटका लावणारा होता...

महादेवाचं गाणं गाऊन त्याने रचला विक्रम... पण अभिनेत्याचा मनाला चटका लावणारा अंत
| Updated on: Feb 15, 2026 | 3:23 PM

देशभरात आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त भक्तीमय वातावरण आहे… अनेक मंदिरांमध्ये देखील महादेवावर आधारित गाणी वाजत आहेत. या गाण्यांमध्ये असं देखील एक गाणं आहे, ज्याने विक्रमी रेकॉर्ड रचला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, गाणं YouTube वर 95.7 अधिक वेळा पाहिले गेले आहे. पण या गाण्याच्या यशामागे एक खोल दुःख आहे. जे आजपर्यंत चाहत्यांना विसरता आलेलं नाही. हे गाणंं ज्या अभिनेत्यावर चित्रित करण्यात आलं, त्या अभिनेत्याचं निधन मनाला चटका लावणारं होतं. आजही तो अभिनेता आपल्यात नाही… यावर विश्वास बसत नाही. अभिनेत्याने छोट्या पडद्यावरुन सुरुवात केली आणि त्याचा प्रवास मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला… पण अभिनेत्याला स्वतःची सर्व स्वप्न पूर्ण करता आली नाहीत.

सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता सुशांत सिंग राजपूत आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ सिनेमात सुशांत याने मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात ‘नमो नमो’ हे गाणं आजही चाहत्यांच्या पसंतीचं आहे. केदारनाथच्या बर्फाळ दऱ्या आणि सुंदर पर्वतांमध्ये चित्रित केलेले हे गाणे अजूनही प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव पाडते. गाण्यात सुशांत यांच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान दिसली. गाण्याचे काही व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात… तर सिनेमात सुंशात याने पिट्टू या भूमिकेला न्याय दिलेला… सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली. सिनेमात बॉक्स ऑफिसवर जवळपास 102.77 कोटी रुपयांची कमाई केली…

सुशांत सिंह राजपूत याचं निधन…

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला.. 14 जून 2020 रोजी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला… सुशांत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःला संपवलं… यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या सुशांत याचा अंत मनाला चटका लावणारा होता. अभिनेत्याच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. अभिनेत्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. अनेकांची सीबीआयकडून चौकशी देखील करण्यात आली. सारा अली खान हिची देखील तेव्हा चौकशी करण्यात आली होती. सुशांत याच्या निधनाला 5 वर्ष झाली आहे. पण आजही त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.