AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : फाईल क्रमांक 503, 508 आणि 567 अजून ओपन आहे, केंद्रीय मंत्र्याचा तो फोटो समोर आल्यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut : "मी मनोज जरांगे पाटील यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राची फार लूट झालेली आहे. महाराष्ट्राची फार बदनामी झाली आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लिलाव झाला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान शिंदे सारख्या लोकांनी लॉरेन्स बिश्नोईच्या पायावर ठेवला आहे" अशी वक्तव्य संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut : फाईल क्रमांक 503, 508 आणि 567 अजून ओपन आहे, केंद्रीय मंत्र्याचा तो फोटो समोर आल्यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut
| Updated on: Oct 22, 2026 | 11:04 AM
Share

“पुढच्या 4 ते 5 महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल. काही काळासाठी देशात पंतप्रधान नसेल” असं धक्कादायक वक्तव्य काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर आज संजय राऊत बोलले आहेत. “नरेंद्र मोदी यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे. मे शेवटचा आठवडा असेल. एप्रिलपासून घसरगुंडीची सुरुवात होईल. त्या पद्धतीने देशातल्या प्रमुख नेत्यांच्या विचारांची दिशा मला दिसतेय. राज ठाकरे यांनी ती भूमिका मांडली. उद्धव ठाकरे मांडत असतात. दिल्लीत राहुल गांधी हेच सांगत होते” असं संजय राऊत म्हणाले. “मी वारंवार हेच सांगतोय देशातलं वातावरण झपाट्याने बदलतय. ज्या पद्धतीने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री इथे मुंबईत आले. त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना इथे बोलवून घेतले. जामनगरला गेले. तिथे बैठक झाली. हे नेते दिल्लीत आल्यावर मोदींना भेटत होते. पण प्रथमच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मोदींनी भेटले नाहीत. ते मुंबईत आले. आतापर्यंत प्रमुख पाहुणे अहमदाबादला नेण्याची प्रथा मोडली” असं संजय राऊत म्हणाले.

“अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जेव्हा आले, त्यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री हरदीप पुरी यांचा एपस्टीन सोबत भेटीचा धक्कादायक फोटो पोस्ट झाला. ते फोटो अमेरिकेतून आला. हा मोदी सरकारला इशारा आहे, फाईल अजून बंद झालेली नाही. फाईल क्रमांक 503, 508 आणि 567 ओपन आहे. याचा अर्थ मी असा घेतो की देशातली एकंदर परिस्थिती मोदींच्या विरोधात आहे. देशात, जगात मोदींना प्रचंड विरोध होतोय. लोकशाहीचा गळा घोटला जातोय. दहशत निर्माण करण्यासाठी बिश्नोई सारख्या गुंडाचा वापर केला जात आहे. आपले गुन्हे लपवण्यासाठी न्यायमुर्तीचे खून झाले. अनेकांचे आवाज दाबले” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हा अराजकता माजवण्याचा प्रयत्न कसा असू शकतो?

“मोदी-अदानी यांची फ्रेंडशिप आहे. डॉक्यूमेंट्रीवर बंदी यावी, सोशल मीडियावरुन डिलिट व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. तरी ती डॉक्यूमेंट्री लोकांपर्यंत पोहोचली. अलबेनियाच्या सुप्रीम कोर्टाला आग लागली. मी तो व्हिडिओ पोस्ट केला म्हणून माझ्यावर अराजकता पसरवण्याचे आरोप होत आहेत. पण तिथे सुद्धा जमिनी एका उद्योगपतीला दिल्या जात होत्या. सुप्रीम कोर्टात निकाल त्याच्याबाजूने लागला. म्हणून लोक रस्त्यावर उतरले. हे मला सांगायचं होतं. हे सांगणं अराजकता माजवण्याचा प्रयत्न कसा असू शकतो” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण