‘पाकिस्तान माझ्यावर पैसा उडवतो…’, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं दाऊद इब्राहिमसोबत खास कनेक्शन, तिला माहितीये अंडरवर्ल्ड डॉनचं ठिकाण?
बॉलिवूडची अशी अभिनेत्री तिच्यावर पाकिस्तान पाण्यासारखे पैसे उडवतो, तिचे दाऊद इब्राहिमसोबत खास कनेक्शन देखील आहेत, एवढंच नाही तर, तिने असा देखील खुलासा केला आहे की, अंडरवर्ल्ड डॉनचं ठिकाण तिला माहितीये... जाणून घ्या कोण आहे 'ती' अभिनेत्री...

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा इंडस्ट्रीवर दाऊद इब्राहिमची दहशत होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक अभिनेत्रींचं संपूर्ण आयुष्य देखील उद्ध्वस्त झाले. पण बॉलिवूडची एक अभिनेत्री अशी आहे, जी म्हणते मला दाऊद इब्राहिमचं ठिकाण माहितीये… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती गेल्या 20 वर्षांपासून कोणत्या न कोणत्या कारणामुळे हेडलाईन्समध्ये असते… आता तिने स्वतःच्या आयुष्यातील अशा एका पैलूबद्दल सांगितलं आहे. ज्याबद्दल फार कोणाला माहिती देखील नसेल.
अभिनेत्री म्हणजे श्रीमंतीचा अनुभव घेण्यापूर्वी गरिबी फार जवळून पाहिलं आहेत. तिचे वडील पोलीस कांस्टेबल होते, त्यानंतर इंस्पेक्टर झाले आणि दाऊद इब्राहिमला पकडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण अभिनेत्रीच्या वडिलांना डॉनला पकडण्यात यश आलं नाही… कारण दाऊदला जाळ्यात अडकवणं फार कठीण काम आहे. नुकताच झालेल्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘सलमान खान याला माहिती आहे, मी कोणत्या चिखलातून आली आहे…’
वडील इंस्पेक्टर असल्याने अभिनेत्री म्हणते, ‘माझे वडील कायम सलमान खानच्या सुरक्षेसाठी तैनात असायचे. दाऊदला पकडण्याची जबाबदारी देखील त्यांना सोपावण्यात आली, पण त्यांना ते शक्य झालं नाही. दाऊदला माझे वडील काय कोणीच पकडू शकत नाही. कारण दाऊद येथे आहे, त्याबद्दल कोणालाच माहिती नाही. फक्त मला माहिती आहे…’, पुढे विनोदी अंदाजात अभिनेत्री असं देखील म्हणते की, ‘आता मला पकडायला येऊ नका…’
असं वक्तव्य करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आहे. पुढे राखी असं देखील म्हणाली की, ‘संपूर्ण पाकिस्तान मला सपोर्ट करतो… हे मी खोटं बोलणार नाही. टिकटॉकवर मला दिवसाला लाखो गिफ्ट मिळतात. दुबईत मला पाकिस्तानकडून सपोर्ट मिळतो. दुबईत माझे शेजारी, ड्रायव्हर आणि कुक देखील पाकिस्तानी आहे…’
राखी पुढे म्हणते, ‘पाकिस्तानी दुबईत करोडो रुपये टिकटॉकवर पाठवतात, त्यातले अर्धे पैसे टिकटॉक ठेवतं आणि बाकी मला मिळतात, महिन्याला मला 30 – 50 लाख रुपये मिळतात. मी 3 – 4 व्हिला घेतले आहेत. मी दुबईत सोनं घालते… पण भारतात माझ्याकडे इतकं नाही… मी दुबईतील शेखा आहे..’ असं देखील राखी म्हणाली.
